● गळफास लावून केली आत्महत्या
Sad News | मारेगाव शहरात वास्तव्यास असलेल्या 32 वर्षीय तरुणाने गळफास लावून मृत्यूला कवटाळल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. मृतकाचे नाव मारोती अंबादास आत्राम असे आहे. A 32-year-old resident of the city committed suicide by hanging himself
मारेगाव शहरातील जुन्या न्यायालयाच्या इमारती लगत असलेल्या परिसरातील एका झाडाला त्याने गळफास लावून आत्महत्या केली. ही बाब सकाळी प्रत्यक्षदर्शीना दिसताच त्याने पोलिसांना सूचना दिली. तोपर्यंत बघ्याची मोठी गर्दी जमा झाली होती. पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून शव उत्तरीय तपासणीसाठी पाठवले आहे.
मारोती हा मेहनती तरुण होता, लहानसहान कामे करून तो आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करायचा. त्याचे पश्चात पत्नी आणि दोन लहान मुले आहेत. त्याने आत्महत्या का केली याचे कारण अस्पष्ट आहे. पुढील तपास पोलीस करताहेत.
Rokhthok News