● सोमवारी सकाळी अंत्यसंस्कार
Sad News | शिवसेना (उबाठा) गटाचे वणी येथील माजी तालुका प्रमुख प्रसाद ठाकरे यांचे वडील विनोद बाबारावजी ठाकरे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी ते 68 वर्षाचे होते, त्यांचेवर मूळ गावी वडाजापूर येथे सोमवारी सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार होणार आहे. Vinod Babaraoji Thackeray passed away after a brief illness
विनोद बाबारावजी ठाकरे हे वडाजापूर येथील निवासी होते तसेच प्रगतिशील शेतकरी तसेच अतिशय मनमिळाऊ स्वभावाचे होते. ते मागील काही महिन्यांपासून आजारी होते. रविवारी सायंकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे पश्चात खूप मोठा गोतावळा आहे. त्यांचेवर सोमवारी सकाळी 11 वाजता वडाजापूर येथील मोक्षधामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
(रोखठोक परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली)