● बोदकुरवार यांनी अधिकाऱ्यांना खडसावले
Wani News | कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात उभ्या असलेल्या 150 ते 200 गाड्या कापूस खरेदीस सीसीआय अधिकाऱ्यांनी नकार दिला. ही बाब माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांना कळताच त्यांनी थेट बाजार समिती गाठली. अधिकाऱ्यांना धारेवर धरत अकोला झोनचे मुख्य व्यवस्थापक निरज कुमार यांच्याशी संपर्क साधला आणि अवघ्या दहा मिनिटात कापूस खरेदीसाठी भाग पाडले. ही बाब सोमवार दिनांक 23 डिसेंबर ला सायंकाळी घडली. Keeping the authorities on edge, Akola zone chief manager Niraj Kumar was contacted
सीसीआय चे अधिकारी शेतकऱ्यांना नाहक त्रास देत असल्याचे पुन्हा उघड झाले. दिनांक 23 डिसेंबरला शेतकरी बांधवांनी मोठ्या प्रमाणावर बाजार समितीत कापसाच्या गाड्या आणल्या होत्या. 150 ते 200 गाड्या बाजार समितीच्या आवारात उभ्या होत्या. दिवसभर खरेदी केल्यानंतर सायंकाळी बाजार समितीच्या आवारात उभ्या असलेल्या गाड्या घेण्यास अधिकाऱ्यांनी नकार दिला.
खेड्या-पाड्यावरून आलेल्या शेतकऱ्यांना बाजार समितीत कापसाच्या गाड्यासह मुक्काम करणे अतिशय त्रासदायक आहे. तसेच आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. सीसीआय ने खरेदी बंद केल्याची बाब माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांना समजली त्यांनी तडक बाजार समिती गाठली. शेतकरी बांधवांच्या अवस्था पाहून बोदकुरवार यांनी अकोला झोनचे मुख्य व्यवस्थापक निरज कुमार यांच्याशी संपर्क साधला.
शेतकऱ्यांचा कापूस खरेदी सुरू करून बाजार समितीच्या आवारात उभ्या असलेल्या शेतकरी बांधवांच्या गाड्या तात्काळ सोडण्यात याव्या असे वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितले. तसेच वणी केंद्र प्रमुख हेमंत ठाकरे यांच्याशी चर्चा करून त्वरित 10 मिनिटात शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करायला भाग पाडले. कापसाच्या गाड्या खरेदी करायला लावल्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी सुटकेचा श्वास टाकला. माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे या परिसरातील शेतकऱ्याची होणाऱ्या हाल अपेष्टा पासून सुटका मिळाली.
Rokhthok News