● निलंबन रद्द करा, डॉ. लोढा यांची मागणी
● पक्षश्रेष्ठींकडे पाठवले विस्तृत निवेदन
Political News | काँग्रेसचे नेते संजय खाडे यांनी विधानसभा निवडणुकीत बंडखोरी केली आणि त्यांना काँग्रेस पक्षाच्या सात पदाधिकाऱ्यांनी साथ दिली होती. पक्षविरोधी कृत्य केल्याचा ठपका ठेवत पक्षश्रेष्टींने पक्षशिस्त भंगाची कारवाई केली होती. अगामी निवडणुका लक्षात घेता कॉंग्रेसचे प्रदेश कार्यकारणी सदस्य डॉ.महेंद्र लोढा यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचेकडे पक्षहीतासाठी निलंबन रदद करण्याची मागणी केली आहे. Dr. Mahendra Lodha has requested the state president Nana Patole to cancel the suspension for the benefit of the party.
वणी विधानसभा क्षेत्रातील उभरते नेतृत्व म्हणुन मागील दोन वर्षांपासुन संजय खाडे यांचेकडे बघितल्या जाते. तसेच ते खासदार प्रतिभा धानोरकर यांचे निकटस्त आहे. वणी विधानसभा क्षेत्रात काँग्रेस पक्षाला संजीवनी देण्याचे कार्य खाडे यांनी केले होते. मात्र विधानसभा निवडणुकीत मविआची उमेदवारी घटक पक्षाला गेल्याने मतदारसंघात कॉंग्रेसचा झंझावात निर्माण करणारे खाडे यांनी बंडखोरी करत उमेदवारी कायम ठेवली होती.
संजय खाडे यांनी केलेली बंडखोरी व त्यांना साथ देणारे कॉंग्रेसचे निष्ठावंत नरेंद्र ठाकरे, पुरूषोत्तम आवारी, प्रमोद वासेकर, शंकर वऱ्हाटे, प्रशांत गोहकार, वंदना आवारी व पलाश बोढे या सर्वांवर पक्षश्रेष्टीने शिस्तभंगाची कारवाई करत कॉंग्रेस पक्षातुन सहा वर्षासाठी निलंबीत केले होते. हे सर्व पदाधिकारी कॉंग्रेस पक्षासोबत सातत्याने एकनिष्ट राहिले आहेत. तसेच अनेक वर्षापासुन पक्ष वाढवण्याचे काम या पदाधिकाऱ्यांनी केले आहे. यामुळे त्यांचे निलंबन मागे घ्यावे अशी रास्त मागणी डॉ. लोढा यांनी पक्षश्रेष्टीकडे केली आहे.
विधानसभा निवडणुकीत राज्यात मविआचा पुरता धुव्वा उडाला. विजयी उमेदवारांचे अर्धशतक सुद्धा गाठता आले नाही. यामुळे काँग्रेस पक्षाने सावध भूमिका घेत संघटन वाढीसाठी चांगल्या कार्यकर्त्यांना पक्षात मनाचे स्थान देणे गरजेचे आहे. जुन्या काँग्रेसी एकनिष्ठांना सल्लागाराच्या भूमिकेत पाठवून नव्या दमाच्या कार्यकर्त्यांना संघटनात्मक बांधणीसाठी प्रोत्साहन देणे अत्यावश्यक आहे. तर आणि तरच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसला यश मिळेल.
Rokhthok News