Home Breaking News आगामी निवडणुकांत हिशेब चुकता करणार…!

आगामी निवडणुकांत हिशेब चुकता करणार…!

● विजय चोरडिया सदस्य नोंदणी प्रमुख ● भाजपने सोपवली महत्त्वाची जबाबदारी

829
C1 20241226 15490016

विजय चोरडिया सदस्य नोंदणी प्रमुख
भाजपने सोपवली महत्त्वाची जबाबदारी

Political News | राज्य कार्यकारिणी सदस्य विजय चोरडिया यांची भाजपच्या वणी विधानसभा क्षेत्र सदस्य नोंदणी प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. शेवटच्‍या घटकापर्यंत पक्ष संघटना पोहचवणार असल्‍याचे चोरडिया यांनी स्‍पष्‍ट केले. तसेच विधानसभेतील पराभवाचा वचपा काढणार असुन आगामी निवडणुकांत हिशेब चुकता करणार असल्‍याची ग्‍वाही त्‍यांनी दिली. Chordia clarified that the party organization will reach to the last element.

विविध जाती-धर्मातील लोकांना एकत्र घेऊन पक्ष संघटन मजबूत करण्‍याचा मानस त्‍यांनी व्‍यक्‍त केला. महिला, दलित, आदिवासी, मुस्लिम समाजातील नवमतदारांना भाजपशी जोडण्याचे तसेच शेवटच्या घटकांपर्यंत पक्ष संघटना पोहोचवण्याचे ध्येय राहणार असल्‍याचे त्‍यांनी सांगीतले. लवकरच नगरपालिका व जिल्हा परिषदेची निवडणूकां होवू घातल्या आहेत. विधानसभेत जरी पक्षाचा पराभव झाला असला तरी आगामी निवडणुकीत भाजप हा “हिशेब” बरोबर करणार असे त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

Img 20250103 Wa0009

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निडवणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात भाजपच्‍या वतीने सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात येत आहे. नुकतीच यवतमाळ येथे जिल्हास्तरीय कार्यशाळा व बैठक पार पडली. यावेळी विजय चोरडिया यांची भाजपच्या वणी विधानसभा क्षेत्र सदस्य नोंदणी प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली.

जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यशाळेला जिल्ह्यातील भाजपचे सर्व आमदार तसेच ज्येष्ठ नेते उपस्थित होते. कार्यशाळेत सदस्य नोंदणीबाबत चर्चा करण्यात आली. विजय चोरडिया यांचा शहरासह ग्रामीण भागात असलेला दांडगा जनसंपर्क पाहता त्यांना संपूर्ण मतदारसंघातील सदस्य नोंदणीची जबाबदारी देण्यात आली. विजय चोरडिया यांनी त्यांच्या निवडीचे श्रेय माजी खासदार हंसराज अहीर यांना दिले आहे. निवडीबाबत त्यांनी जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे, मंत्री डॉ. अशोक उईक, आ. राजू तोडसाम,  मदन येरावार, नितीन भुतडा यांचे आभार मानले.

विजय चोरडिया हे ज्येष्ठ नेते असून त्यांचा राजकारणाचा दीर्घ अनुभव आहे. याशिवाय एक सेवाभावी व्यक्ती व सामाजिक, धार्मिक कार्यात कायम अग्रेसर असणारे कार्यकर्ते अशी देखील त्यांची ओळख आहे. आरोग्य शिबिर व विविध धार्मिक, सामाजिक कार्यामुळे त्यांचा संपूर्ण वणी विधानसभा मतदारसंघात दांडगा जनसंपर्क आहे. त्याचा पक्षाला नक्कीच फायदा होणार आहे. त्यांच्या निवडीबाबत मतदारसंघात समाधान व्यक्त केले जात आहे.   
Rokhthok News