● वाहतूक अस्ताव्यस्त, अवैधधंदे जोमात
● रामनवमी समिती आंदोलनात्मक पवित्र्यात
Wani News | शहरात चोरी, घरफोडीच्या घटनेत कमालीची वाढ झाली आहे. गुन्हेगारी प्रचंड बोकाळली आहे. अवैधधंदे जोमात सुरु आहे, वाहतुक व्यवस्थेचा पुर्णतः बोजवारा उडाला आहे. अवैध प्रवासी वाहतुक करणारे ऑटो व धुमस्टाईल बायकर्स यांनी धुमाकुळ घातला आहे. निरपराध नागरीकांचा जीव धोक्यात आल्याचा सनसनाटी आरोप राम नवमी समितीचे अध्यक्ष रवी बेलुरकर यांनी पञपरिषदेतुन केला. A question mark on the functioning of the police administration
● वाहतूक शाखा कुंभकर्णी झोपेत
शहरात भरधाव दुचाकी वाहने हाकणाऱ्या बायकर्सचा उपद्व्याप मोठया प्रमाणात वाढला आहे. लोकमान्य टिळक महाविद्यालयासमोर भरधाव दुचाकी हाकणाऱ्याने नागोजी आवारी या पादचाऱ्याला जबर धडक दिली यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. असे अपघात नित्याचेच झाले आहे. वाहतुक शाखा सपशेल अपयशी ठरल्याचे दिसत आहे. ठिकठिकाणी असणारे ऑटो रिक्षाचे थांबे वाहतुकीस अडथळा ठरत आहे तर ऑटो चालकांची अरेरावी नागरीकांना अनुभवायला मिळत आहे.
● घरफोडी, चोरी, मटका-जुगार जोमात
पोलीस प्रशासनाचा वचक संपुष्टात आल्याचे सकृतदर्शनी दिसत आहे. पोलीस प्रशासन नेमके काय करताहेत हेच कळायला मार्ग नाही. शहरात मागील काही दिवसांपासुन चोरी, घरफोडीच्या घटनांत वाढ झाली आहे. बंदघरे चोरटयांच्या निशाण्यावर आहेत, पोलीसांची गस्त कुचकामी ठरतांना दिसत आहे. तसेच शहरात ठिकठिकाणी बिनधास्त जोमात चालणारे मटका अडडे, प्रतिबंधित तंबाखूचा वाहणारा महापूर पोलीसांची कार्यपध्दती उजागर करतांना दिसत आहे.
● शहरात धुमस्टाईल बायकर्सचा धुमाकूळ
शहरातील वरोरा मार्ग, विठठलवाडी ते नांदेपेरा मार्गापर्यंत असलेला डीपी रस्ता, चर्च ते डीपी मार्गाला जोडणारा रस्ता, जनता शाळा व विवेकानंद शाळा परिसरातील रस्ता हे सर्व ठिकाणी रोड रोमीयोंचा चालणारा हैदोस आणि धुमस्टाईल बायकर्सचा धुमाकुळ पहायला मिळतो. भरधाव हाकण्यात येणाऱ्या दुचाकी आणि होत असलेली चेंगडबाजी विद्यार्थिनींना सहन कराव्या लागणाऱ्या यातना पोलीसांना दिसत नाही का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कायदा व सुव्यवस्था यावर प्रश्नचिन्ह उभे झाले आहे, याविषयी पोलीस प्रशासन व उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच उपविभागीय अधिकारी लक्ष घालतांना दिसत नाही. शहरातील या गंभीर बाबींची तिव्रता लक्षात घेवून जनहितार्थ राम नवमी समितीचे अध्यक्ष रवि बेलुरकर यांनी आंदोलनाची भुमीका निश्चित केली आहे. पोलीस प्रशासनाला 7 दिवसांचा अल्टीमेटम देण्यात आला आहे. त्यानंतर राम नवमी समिती, सामाजीक संघटना व नागरीकांना सोबत घेत स्वाक्षरी अभियान, धरणे आंदोलन, वरिष्ठ पातळीवर निवेदने देणार असल्याचे बेलुरकर यांनी स्पष्ट केले.
पोलीसांनी तातडीने सर्व महत्वपुर्ण समस्येवर सात दिवसांत कठोर अमलबजावणी करावी अन्यथा शेवटचा पर्याय राज्याचे गृह मंञी यांची भेट घेवून “सोक्षमोक्ष” लावण्यात येईल असा ईशारा देण्यात आला आहे. यावेळी पत्रकार परिषदेमध्ये समितीचे कुंतलेश्वर तुरविले, संतोष डंभारे, मनोज सरमोकदम, कौशीक खेरा, आशिष डंभारे, प्रणव पिंपळे, पंकज कासावर, नितीन बिहारी, मयुर मेहता, पियुष चव्हाण, पवन खंडाळकर, कमलेश त्रिवेदी, सुरज निकुरे, निखील एकरे, मयुर घाटोळे, नितीन बडघरे, तुषार घाटोळे, प्रणित महाकारकार, बालाजी भदोडकर, शुभम इंगळे यांची उपस्थिती होती.
Rokhthok News