● पत्रकार विवेक तोटेवार यांना पितृशोक
Sad News | शहरातील रामपुरा वॉर्डात वास्तव्यास असलेले भैयाजी बापूराव तोटेवार यांचे अल्पशा आजाराने निधन झाले मृत्यूसमयी ते 74 वर्षाचे होते. शनिवारी सकाळी 7 वाजता त्यांचे राहते घरी त्यांची प्राणज्योत मालवली. Bhaiyaji Bapurao Totewar passed away after a brief illness
भैयाजी तोटेवार हे मागील काही दिवसांपासून आजारी होते. डॉक्टरांच्या मार्गदर्शनात त्यांच्यावर घरीच उपचार सुरु होता. शनिवारी सकाळी अचानक त्यांना अस्वस्थ वाटायला लागले आणि त्यांची प्राणज्योत मालवली. पत्रकार विवेक तोटेवार यांचे ते वडील होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलं, एक मुलगी नातवंड असा मोठा आप्त परिवार आहे. त्यांच्यावर आज दुपारी अंत्यसंस्कार केले जाणार आहे.
( रोखठोक परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली)