● वाटसरू नी मानले देरकरांचे आभार
Wani News | नवनिर्वाचित आमदार संजय देरकर पायाला भिंगरी असल्यागत मतदारसंघात फिरताहेत.असंच या गावावरून त्या गावी मार्गक्रमण करत असताना एक वाहन रस्त्याच्या कडेला खड्यात उतरल्याचे त्यांना दिसले. त्यांनी लगेचच आपले वाहन थांबवून प्रवाशांना दिलासा दिला व ते वाहन कार्यकर्त्यांच्या मदतीने बाहेर काढत माणुसकीचा प्रत्यय दाखवून दिला. The vehicle landed on the side of the road, MLAs rushed to help
मतदारसंघात विविध कामानिमित्त भ्रमंती करावी लागते. मतदारांच्या भेटीगाठी त्यांच्या समस्या जाणून घेत त्या सोडवण्याचा प्रयत्न करणे लोकप्रतिनिधी चे कामच आहे. तसेच आ. देरकरांनी शिवसेनेचे ब्रीद “80 टक्के समाजकारण 20 टक्के राजकारण” अंगिकारल्याचे दिसत आहे.
मतदारसंघातील एका रस्त्यावर MH-34-BF-3363 या वाहनवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि वाहन रस्त्याच्या कडेला चक्क खड्यात उतरले. या वाहनातून एक कुटुंब प्रवास करत होते. त्यात दोन महिला सुद्धा होत्या. अपघातात कोणतीही हानी झाली नाही मात्र वाहन बाहेर कसे काढायचे या विवंचनेत तो परिवार होता.
त्याच वेळी आ. संजय देरकर त्या मार्गावरून जात होते, त्यांनी क्षणाचा विलंब न लावता आपल्या कार्यकर्त्याना ते वाहन बाहेर काढायला लावले. तसेच त्या परिवाराला दिलासा दिला. त्या परिवाराने आ. देरकरांचे आभार मानले व मार्गस्थ झाले. ही बाब लहान आहे मात्र जनतेप्रती असणारी आपुलकी अशाच घटनांतून सिद्ध होते.
Rokhthok News