● गोवंश तस्करांच्या आवळल्या मुसक्या
● 121 जनावरांची सुटका, तिघे अटकेत
Crime News | नववर्षात पोलीस प्रशासन सजग आणि दक्ष झाल्याचे दिसत आहे. प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारे LCB पथकाने पांढकरवडा-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावर सापळा रचला. सोमवारी पहाटे 5 वाजताच्या दरम्यान दोन ट्रकची झाडाझडती घेतली असता गोवंश तस्करीचा भांडाफोड झाला. 121 गोवंशासह तब्बल 87 लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला तर तिघांना जेरबंद करण्यात आले आहे. LCB …squad’s loud action, 87 lakh worth of goods seized
मोहंमद हातम अब्दुल नबी (49) राहणार दुर्गा चौक रोशनपुरा मुर्तिजापुर जि. अकोला, मोसिन अली सैय्यद मोबीन (45) रा. वार्ड क्रमांक 1 रेत ता. अकोट जि. अकोला, ईरशाद उल्लाखा किस्मत उल्ला खाँ (32) रा. पठाणपुरा मुर्तिजापुर जि. अकोला असे ताब्यात घेतलेल्या गोवंश तस्करांची नावे आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस अधीक्षक कुमार चिता यांच्या आदेशावरून गुन्हेगार तपासणी मोहीम राबवत होते. त्याच वेळी गोपनीय बतमीदाराने काही ईसम नागपुर- पांढकरवडा-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावरुन हैद्राबाद करीता ट्रक क्रमांक MH-26-BN-1137 व ट्रक क्रमांक CG-24-S-7667 मधून गोवंश तस्करी करीत असल्याची माहिती दिली.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने राष्ट्रीय महामार्गावर पाळत ठेवली. पहाटे पाच वाजता दोन संशयित ट्रक दिसून आले. दोन्ही वाहनांची झाडाझडती घेतली असता त्यात निर्दयपणे कोंबून असलेले गोवंशीय बैल, गोरे, असे एकुण 121 गोवंश जातीचे जनावरे आढळून आले. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेत एकूण तब्बल 87 लाख 21 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. तर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलीस अधिक्षक कुमार चिता, उपविभागीय पोलीस अधिकारी, पांढरकवडा रामेश्वर वेंजणे यांचे मार्गदर्शनात पो.नि. सतिश चवरे, सपोनि अजयकुमार वाढवे, उल्हास कुरकुटे, सुनिल खंडागळे, सुधिर पांडे, सुधिर पिदुरकर, निलेश निमकर, रजणिकांत मडावी चालक सतिश फुके यांनी यशस्वीरित्या पार पाडली.
Rokhthok News