Home क्राईम पोलीस अधिक्षकांकडे मांडले अवैद्यधंद्याचे वास्तव

पोलीस अधिक्षकांकडे मांडले अवैद्यधंद्याचे वास्तव

● श्री. रामनवमी समितीने दिले निवेदन

847
C1 20250109 17385996

श्री. रामनवमी समितीने दिले निवेदन

Wani News | तालुक्यातील अवैधधंदे तसेच अवैध व अस्ताव्यस्त वाहतुक बंद करावी याकरीता प्रभु श्रीराम नवमी उत्सव समिती आक्रमक झाली आहे. गुरुवार दिनांक 9 जानेवारीला समितीचे अध्यक्ष रवी बेलूरकर यांच्या नेतृत्वात जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देत तालुका व शहरातील अवैध धंद्याचे वास्तव कथन केले. The reality of illegal business presented to the Superintendent of Police

तालुक्यात मोठ्या प्रमाणात मटका, जुगार, ग्रामीण भागात दारूचे वितरण, कोंबडबाजार, झंडीमुंडी, चेंगड, कोळसा तस्करी, रेती तस्करी, मादक पदार्थाची रेलचेल या सारखे अवैधधंदे बिनधास्त सुरु आहे. त्या प्रमाणेच चोरी, घरफोडी, भंगार चोरीच्या घटनेत वाढ झाली आहे. पोलीस प्रशासन सुस्तावल्याचे दिसत असून कायदा व सुव्यवस्था यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.

Img 20250103 Wa0009

वणी शहरात अवैध प्रवासी वाहतुक, बेशिस्त वाहन चालक, धूमस्टाईल बायकर्स, अल्पवयीन भरधाव दुचाकी हाकत असल्याचे चित्र, ऑटो चालकाची अरेरावी, प्रवासी खेचण्याचा नादात अस्तव्यस्त वाहतूक प्रत्यक्ष नागरीकांना अनुभवावी लागत आहे. प्रभु श्रीराम नवमी उत्सव समितीने आक्रमक भूमिका घेतल्याने काही प्रमाणात वाहतूक शाखेने बडगा उगारला मात्र समूळ उच्चाटन करण्याची गरज निर्माण झाली आहे.

पोलीस प्रशासनाने अवैध धंद्याला पुर्णतः मोकळीक दिल्याने अवैध धंदे चांगलेच बहरले आहे. खुलेआम चेंगड, झंडीमुंडी सुरु असल्याचे वास्तव sdpo च्या पथकाने केलेल्या कारवाई वरून सिद्ध झाले आहे. रेती चोरी, सुगंधित तंबाखूचा तर महापूर आलेला आहे. थातुरमातुर कारवाया हा यावर पर्याय नसून पोलीस प्रशासनाने कठोर भूमिका वठवावी अशी मागणी राम नवमी समितीचे अध्यक्ष रवी बेलूरकर यांनी निवेदनातून केली आहे.

शांतताप्रिय शहर म्हणून वणीची ख्याती आहे, येथे जातीय धर्माचा कुठलाही वाद नसून सर्व नागरीक सलोख्याने राहतात. मात्र पोलीस प्रशासन व वाहतूक शाखेचा अनागोंदी कारभार आणि संपुष्टात आलेला पोलिसी वचक यामुळे कायदा व सुव्यवस्थेवर नियंत्रण राहिलेले नाही असा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.

सर्व बाबींचा विचार करून तात्काळ कारवाई करावी अशी मागणी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावर आता नेमकी काय कारवाई होणार याकडे लक्ष लागले आहे. यावेळी रवि बेलुरकर यांच्या सह प्रणव पिंपळे, नितीन बिहारी, मयुर मेहता, बालाजी भेदोडकर, प्रणित महाकारकर, नितीन भटगरे, तुषार घाटोळे, राजेंद्र सिडाम, ऍड. प्रवीण पाठक, सुमित शिखरे यांची उपस्थिती होती.
Rokhthok News