● माजी आमदार बोदकुरवार यांचा पाठपुरावा
● 15 जानेवारी पासून निविदा प्रक्रिया
Wani News | तत्कालीन आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी पावसाळी अधिवेशनात मतदारसंघातील मालगुजारी तलावाच्या दुरुस्तीचा मुद्दा उपस्थित केला होता. शासनाने 22 मामा तलावाचा दुरुस्तीसाठी तब्बल 6 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. 15 जानेवारी 2025 पासून निविदेची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध झाली आहे. माजी आमदार बोदकुरवार यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. The follow-up done by former MLA Bodkurwar has been successful
माजी मालगुजारी तलावाची संख्या मतदारसंघात मोठया प्रमाणात आहे. देखभाल दुरुस्ती अभावी मामा तलावाची अवस्था बकाल झाली आहे. यामुळे स्थानिकांच्या उपजीविकेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. मत्स्यव्यवसाय तथा तत्सम उपयोगिता संपुष्टात आल्याने मालगुजारी तलावाची दुरुस्ती करणे अत्यावश्यक होते. यामुळे तत्कालीन आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी पावसाळी अधिवेशन 2023 मध्ये प्रश्न उपस्थित केला.
अधिवेशनात मांडलेल्या प्रश्नाला उत्तर देताना तत्कालीन जलसंधारण मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपयुक्तता लक्षात घेत उपाययोजनेचा शब्द दिला होता आणि अवघ्या काही दिवसातच बोदकुरवार यांच्या मागणी नुसार वणी विधानसभा मतदारसंघातील 22 मामा तलावाच्या दुरूस्ती करिता 6 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. 15 जानेवारीपासून निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे तर 24 जानेवारीला निविदा उघडण्यात येणार आहे.
वणी मतदारसंघातील मेंढोली, कोलेरा, बोरगाव, कोरंबी (मारेगाव), निंबाळा, मुकुटबन, कोसारा, डोंगरगाव, अडेगाव, खांदला, साखरदरा, निळापूर, पिंपरी, महाकालपुर, सावरला, रासा, कायर, लालगुडा, मंदर, शिंदोला, तरोडा, कानेडा येथील माजी मालगुजारी तलावांचा समावेश आहे.
Rokhthok News