● संपूर्ण मित्र परिवार शोकमग्न
Sad News | अतिशय सोज्वळ व्यक्तिमत्त्व, मनमिळाऊ स्वभाव असलेले दिनेश जयस्वाल यांचे अल्पशा आजाराने मंगळवारी सायंकाळी निधन झाले. त्यांच्या अनपेक्षित exit ने मित्रपरिवार व पारिवारिक मंडळीत कमालीची शोककळा पसरली आहे. Sad News….exit of Lala Dinesh Jaiswal
दिनेश जयस्वाल (54) हे bsnl सिमचे अधिकृत विक्रेते होते. ते मूळचे दारव्हा तालुक्यातील बोरिअरब येथील निवासी होते. त्यांचा वणी परिसरात मोठा मित्र परिवार होता. काही दिवसापूर्वी त्यांच्या पायाच्या बोटावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर त्यांची प्रकृती सातत्याने बिघडतच होती. मधुमेह तसेच हृदयविकाराने त्यांना घेरले होते.
मंगळवारी त्यांना येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. सायंकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचेवर बोरिअरब येथे बुधवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे पश्चात पत्नी, दोन मुले व मोठा आप्तस्वकीय परिवार आहे.
(रोखठोक परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली)