● नवीनतम ठाणेदारांला चोरट्यांची सलामी
● श्वान पथक व फिंगरप्रिंट एक्सपर्ट वणीत
● LCB पथक तपास यंत्रणेत सहभागी
Crime News | शहरातील साधनकर वाडी परिसरात कुलूपबंद घराला चोरट्यांनी लक्ष केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. या घटनेत लाखोंचा ऐवज लंपास झाल्याचे बोलल्या जात असले तरी घरमालक घरी परतल्यावरच नेमकी किती चोरी झाली हे स्पष्ट होणार आहे. याप्रकरणी अक्षय प्रदीप चिंडालिया यांनी पोलिसात तक्रार दाखल केली असून श्वान पथक व फिंगरप्रिंट एक्सपर्ट यांना पाचारण करण्यात आले आहे. There was an incident where thieves targeted a locked house
मागील काही महिन्यांपासून येथील पोलीस यंत्रणेवर गंडांतर आल्याचे दिसत आहे. विविध प्रकारचे किस्से आणि घटना घडामोडी घडताहेत. कायदा व सुव्यवस्था खरंच धोक्यात आली का ? हा विषय संशोधनाचा असला तरी अधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांवर नियंत्रण नसल्याचे स्पष्ट होत आहे. कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभाराचा फटका मात्र मावळत्या ठाणेदाराला बसला अशी चर्चा रंगायला लागली आहे.
नव्यानेच रुजू झालेले ठाणेदार गोपाल उंबरकर यांना चोरट्यांनी सलामी देत कुलूपबंद घराला लक्ष करत धाडसी चोरी केली आहे. घरमालक प्रदीप चिंडालिया हे परिवारासह तीर्थयात्रेला रामेश्वरम येथे गेले होते. घर कुलूपबंद असल्याचे हेरून चोरट्यांनी डाव साधला आणि घरातील मौल्यवान ऐवज व रोकड लंपास करण्यात आली. ही बाब कळताच प्रदीप चिंडालिया यांचा मुलगा अक्षय याने घरी धाव घेत पाहणी केली असता लाखोंचा ऐवज लंपास झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
घटनेची तक्रार पोलिसात देण्यात आली, पोलिसांनी श्वान पथक व फिंगरप्रिंट एक्सपर्ट यांना पाचारण केले. चोरट्यांचा माग शोधण्याचा प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व स्थानिक पोलिसांनी तपास हाती घेतला असून अद्याप ठोस धागेदोरे हाती लागले नाही. मात्र याप्रकरणी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असल्याने विस्तृत माहिती प्राप्त होऊ शकली नाही.
Rokhthok News