Home Breaking News आणि…त्‍याने घेतला आत्‍मघाती निर्णय

आणि…त्‍याने घेतला आत्‍मघाती निर्णय

● गळफास लावून संपवले जीवन

2772
C1 20240121 12182191
C1 20240404 14205351

गळफास लावून संपवले जीवन

Sad News : तालुक्‍यातील शिवणी (जहांगीर) येथे वास्‍तव्‍यास असलेल्‍या 21 वर्षीय तरुणांने आत्‍मघाती निर्णय घेतला. घरी कोणीच नसल्‍याची संधी साधत त्‍याने गळफास लावून जीवन संपवले. ही हृदयद्रावक घटना शनिवार दिनांक 20 जानेवारीला सायंकाळी उघडकीस आली. 21 year old boy took a suicidal decision.

गुंजन अशोक राजुरकर (21) असे मृतक तरुणांचे नांव आहे, तो आपल्‍या परिवारांसह शिवणी (जहांगीर) येथे वास्‍तव्‍यास होता. मृतक आणि त्‍याचा भाऊ  हे दोघेही खाजगी नोकरी करुन तो आपल्‍या परिवारांला आर्थिक साहाय्य करत होते. तर त्‍याची आई गावातच असलेली पिठाची गिरणी चालवायची.

घटनेच्‍या दिवशी मृतक गुंजनचा भाऊ कर्तव्‍यावर गेला होता तर आई पिठ गिरणीवर गेली होती. घरी कोणीच नसल्‍याची संधी साधून त्‍याने छताला दोरीच्‍या सहाय्याने गळफास लावला. आई घरी परतताच तो गळफास घेतलेल्‍या अवस्‍थेत आढळून आल्‍याने तिने जोरात हंबरडा फोडला यामुळे शेजारी जमा झाले. पोलीसांना सुचित करण्‍यात आले. पोलीसांनी घटनास्‍थळ गाठून पंचनामा केला. त्‍याने टोकाचे पाउल का उचलले हे स्‍पष्‍ट झाले नाही पुढील तपास पोलीस करताहेत.
Rokhthok News