Home क्राईम कत्तली करिता नेत असलेल्या गोवंशाची सुटका

कत्तली करिता नेत असलेल्या गोवंशाची सुटका

● LCB ची कारवाई, 13 लाखाचा मुद्देमाल जप्त

913

LCB ची कारवाई, 13 लाखाचा मुद्देमाल जप्त

Crime News Yavatmal: जिल्ह्यातील बहुतेक महामार्गावरून तेलंगणा, आंध्रप्रदेश तसेच अन्यत्र गोवंशाची तस्करी होत आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने सापळा रचून 36 गोवंशाची सुटका केली. 13 लाखाचा मुद्देमाल जप्त करत दोघांना ताब्यात घेतले असून एक पसार झाला आहे, ही कारवाई दि. 21 जूनला पहाटे 6:30 वाजता मनदेव घाटात करण्यात आली. A team of Local Crime Branch (LCB) laid a trap and rescued 36 cows.

स्थानिक गुन्हे शाखेचे (LCB) पथक गुन्हेगारांची माहिती घेणे करीता पेट्रोलींग करत होते. त्याचवेळी गोपनीय महितगाराने ‘टीप’ दिली असता आर्णी मार्गावरील महादेव मंदिर, मनदेव येथे सापळा रचला. आज पहाटे भरधाव येत असलेल्या ट्रक क्रमांक MP- 50- H- 0902 ला अडवून झाडाझडती घेतली असता कत्तली करिता नेत असलेले 36 गोवंश आढळून आले.

यावेळी ट्रकच्या कॅबिन मध्ये बसून असलेले तिघे गोवंश तस्कर खाली उतरले व पळायला लागले. पोलिसांनी पाठलाग करत दोघांच्या मुसक्या आवळल्या तर एक मनदेव च्या जंगलात पसार झाला. पंचासमक्ष ट्रकची तपासणी केली असता त्यात गोवंशीय बैल व गोरे दाटीवाटीने व आखुड दोरीने बांधलेले कोंबून असलेल्या अवस्थेत आढळून आले. तर दोन बैल मृतावस्थेत होते.

जाकीर मुजिफ शेख (28) रा. भाई तलाव वार्ड, पवनी जि. भंडारा (ट्रकचालक), बशिर अब्दुल अजित कुरेशी (37) रा. शिवाजी चौक पिलीनदी,नागपुर तर पसार झालेल्याचे नाव जावेद खान असून तो मजूर असल्याचे सांगितले. जनावरे ही नागपुर येथील नासीर कुरेशी याचे असल्याचे सांगुन त्याचेच सांगणेवरुन नागपुर येथून नांदेड येथे कत्तलीकरीता नेत असल्याची कबुली ताब्यातील आरोपीने दिली.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोड (dr. Pavan bansod), अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप (piyush jagtap), LCB प्रमुख प्रदीप परदेशी यांच्या मार्गदर्शनात API अमोल मुडे, गणेश वनारे, PSI योगेश रंधे, योगेश डगवार, महमंद चव्हाण, सुनिल खंडागळे, सुधिर पांडे, सुधिर पिदुरकर, निलेश निमकर, किशोर झेंडेकर, मिथुन जाधव, रजनिकांत मडावी, अमित झेंडेकर, नरेश राउत, सतिश फुके यांनी केली.
Rokhthok News