Home राजकीय राष्ट्रवादीला खिंडार….डॉ. जिवतोडे करणार भाजपात प्रवेश

राष्ट्रवादीला खिंडार….डॉ. जिवतोडे करणार भाजपात प्रवेश

● शैक्षणिक क्षेत्रातील दिग्गज समजले जाणारे डॉ. जीवतोडे यांच्या पक्षप्रवेशाने भाजपाला 'तगडा' कार्यकर्ता लाभला आहे.

862

भाजपाचे नेते राहणार सोहळ्याला उपस्थित

Political News Chandrapur | विदर्भाच्या शैक्षणिक क्षेत्रातील दिग्गज आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय समन्वयक प्राचार्य डॉ. अशोक जीवतोडे (ashok jivtode)  हे राष्‍ट्रवादीला “रामराम” करत भाजपात प्रवेश करणार आहेत. राज्‍यातील भाजपाचे धुरंधर नेते या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. चंद्रपूर आणि विदर्भात शैक्षणिक क्षेत्रातील दिग्गज समजले जाणारे डॉ. जीवतोडे यांच्या पक्षप्रवेशाने भाजपाला ‘तगडा’ नेता व धडाडीचा कार्यकर्ता लाभला आहे. Principal Dr. Ashok Jivtode will join the Bharatiya Janata Party

ओबीसी नेते म्‍हणुन डॉ. जीवतोडे यांना विदर्भात ओळखल्‍या जाते. ओबीसीच्या न्याय मागण्या पूर्ण व्‍हाव्‍या याकरीता त्‍यांनी अनेक आंदोलने केली आहेत. भारतीय जनता पक्षाने ओबीसी मंत्रालय स्थापन झाल्यापासून आजवर ओबीसींच्या हितासंबंधीचे 32 जीआर (GR) पारित करण्यात आले. भारतीय जनता पक्ष हा ओबीसींना तारणहार ठरणारा पक्ष असल्यानेच या पक्षात प्रवेश करत असल्‍याची माहिती ओबीसी नेते प्राचार्य अशोक जीवतोडे (ashok jivtode) यांनी दिली.

चंद्रपुर येथील जनता महाविद्यालयाच्या पटांगणावर रविवार दि. 25 जुनला दुपारी 3.30 वाजता पक्ष प्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला उप मुख्‍यमंञी देवेंद्र फडणविस, भाजपा प्रदेशाध्‍यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,  पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, माजी मंत्री शोभाताई फडणविस,  आमदार बंटी भांगडिया, आमदार परिणय फुके, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे  यांचेसह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहे.

राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय समन्वयक प्राचार्य डॉ. अशोक जीवतोडे (ashok jivtode) यांनी 2021 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश घेतला होता. पक्षाची संघटना बांधणी करत असतांना पक्षाकडुन हवी तशी मदत मिळत नव्‍हती. त्‍यातच ओबीसींच्‍या न्‍याय मागण्या पूर्ण व्‍हाव्‍यात याकरीता केंद्रात सत्‍ता महत्‍वाची आहे. भारतीय जनता पक्ष हा ओबीसींना तारणहार ठरणारा पक्ष असल्याने त्‍यांनी भाजपात प्रवेश करण्‍याची रणनिती आखली ती आता पुर्णत्‍वास येत आहे.

डॉ. जीवतोडे 35 वर्षांपासून सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहे 1967 मध्ये राजुरा विधानसभा क्षेत्रातून त्यांचे वडील दिवंगत श्रीहरी जीवतोडे अपक्ष आमदार म्हणून निवडून आले होते. त्यांचे बंधू दिवंगत संजय जीवतोडे राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून पक्षाशी जुळले होते. ओबीसी मंत्रालयाच्या स्थापनेसाठी नागपूर हिवाळी अधिवेशनात 18 डिसेंबर 2018 ला मोर्चा काढला त्यात डॉ. जीवतोडे यांनी इतर ओबीसी नेत्यांसोबत मोर्चाचे नेतृत्व केले होते. 
Rokhthok News