Home क्राईम सराईत तडीपार पोलिसांच्या ताब्यात

सराईत तडीपार पोलिसांच्या ताब्यात

1279

SDO यांच्या आदेशाचे उल्लंघन
शिरपूर पोलिसांची कारवाई

सहा महिने वणी तालुक्यातुन तडीपार असलेला 50 वर्षीय व्यक्ती गावातच बिनधास्त वावरत असल्याचे शिरपूर पोलिसांना कळले. उपविभागीय दंडाधीकारी यांनी दिलेल्या तडीपरीचे उल्लंघन केल्याने शिरपूर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

कवडु नामदेव टिकले (50) हा पुरड येथील निवासी आहे. त्याचेवर शिरपूर पोलिसात अनेक गुन्ह्याची नोंद असल्याने प्रभावीपणे प्रतीबंधक कारवाई करण्या करीता शिरपुर पोलीस स्टेशन कडुन उप विभागीय दंडाधीकारी वणी यांना मुंबई पोलीस कायदा कलम 57 प्रमाणे यवतमाळ जिल्हातुन तडीपार करणे बाबत तडीपार प्रस्ताव सादर करण्यात आला होता.

उपविभागीय दंडाधीकारी डॉ. शरद जावळे यांनी 30 सप्टेंबर ला महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 57 (अ). (2) प्रमाणे वणी तालुक्यातून 6 महिन्या करीता तडीपार करण्याचे आदेश पारित करून तालुक्यात येण्यास बंदी होती.

आदेशाचे उल्लंघन करत कवडू टिकले तालुक्यातच वावरत होता. दि. 23 नोव्हेंबर ला तो पुरड गावात असल्याची गोपनीय माहिती ठाणेदार गजानन करेवाड यांना मिळाली होती. पोलिसांनी घराची तपासणी केली असता तो घरी आढळून आला.

उपविभागीय दंडाधीकारी वणी यांचे आदेशाचे उल्लंघन केल्याने त्याचेवर शिरपुर पोलीस स्टेशन मध्ये मुंबई पोलीस कायदा कलम 142 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्याला अटक करुन न्यायालयात हजर करण्यात आले आहे.

शिरपुर पोलीस स्टेशनचे अभीलेखावर दोन पेक्षा जास्त गुन्हे असणारे आरोपीवर प्रभावीपणे प्रतीबंधक कारवाई करण्यात येत आहे. तसेच कृती आराखडा तयार करण्यात येत असल्याचे या प्रसंगी ठाणेदार करेवाड यांनी सांगितले.

सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, अपर पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे, उपविभागीय पोलीस अधीकारी संजय पुजलवार यांच्या मार्गदर्शनात सहा पोलीस निरीक्षक गजानन करेवाड, निळकंठ आडे, प्रवीण गायकवाड, अमोल कोवे, प्रमोद जुनुनकर, गंगाधर घोडाम, अनिल सुरपाम, अभीजीत कोषटवार, गजानन सावसाकडे यांनी केली.
वणी: बातमीदार