Home Breaking News अरेच्चा…. डॉक्टरनेच… डॉक्टरला बदडले

अरेच्चा…. डॉक्टरनेच… डॉक्टरला बदडले

1629

उसनवरीच्या रक्कमेवरून वाद
वणी पोलिसात गुन्हा नोंद

वणी: जीव वाचवणारेच जीवावर उठल्याची खळबळजनक घटना शहरात घडली. उसनवरीच्या रक्कमेवरून दोन डॉक्टरांत वाद होता. रक्कम घेणाऱ्यानेच तडक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल गाठून पैसे देणाऱ्या डॉक्टर ला बदडल्याची घटना गुरुवार दि. 23 डिसेंबर ला दुपारी 3 वाजता घडली.

डॉ. विजय राठोड हे दंत चिकित्सक आहेत, त्यांचे येथील खाती चौकात क्लिनिक असून वणी पोलिसात तक्रारीअंती त्यांचेवर अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्यांनी दुसऱ्या डॉक्टर कडून उसनवारीने घेतलेली रक्कम देण्यास नकार देत मारहाण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

डॉ सुदर्शन दिगंबरराव कळकटे (34) राधानगरी,(रविनगर) हे येथील सुगम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत. त्यांनी डॉ. राठोड यांना 2 लाख 98 हजार रुपये उसनवारी ने दिले होते. बरेच दिवस लोटले तरी ते ती रक्कम परत करत नव्हते.

त्या दोघांत असलेल्या मैत्रीमुळे झालेल्या या व्यवहारात डॉ. कळकटे यांनी रक्कम मिळेलच ही आशा बाळगली होती. परंतू अडचण भासल्याने डॉ राठोड कडे दिलेल्या पैशाची मागणी केली होती. मात्र ते रक्कम देण्यास टाळाटाळ करीत होते आणि धमकी सुध्दा देत होते.

या बाबत डॉ. कळकटे यांच्या वडिलांनी उसनवारीने दिलेल्या रकमेची मागणी केली. डॉ. राठोड यांच्या ही बाब जिव्हारी लागली. त्यांनी थेट डॉ. कळकटे कार्यरत असलेला दवाखाना गाठला आणि शिवीगाळ करीत मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली.

शहरात डॉक्टरांने डॉक्टरालाच बदडल्याने चांगलीच खळबळ माजली असून जीव वाचवणारेच जीवावर उठल्याचे सकृतदर्शनी दिसत आहेत. सुशिक्षित व्यक्तीच असे वागत असेल तर सर्वसामान्यांनी काय धडा घ्यावा हा प्रश्न अनुत्तरित राहणार आहे.
वणी: बातमीदार