Home वणी परिसर स्वर्णलीलात विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ

स्वर्णलीलात विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ

555

विविध कार्यक्रमांचे आयोजन

वणी:- येथील स्वर्णलीला इंटरनॅशनल स्कूल मध्ये 10 वी च्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ व के.जी. 2 च्या विद्यार्थ्यांचा ग्रज्युएशन डेचे आयोजन करण्यात आले.

यावेळी अलफोर्स ग्रुप ऑफ स्कूल आणि कॉलेजचे चेअरमन डॉ. व्ही. एन.रेड्डी यांची प्रमुख उपस्थिती होती. के.जी.2 च्या विद्यार्थ्यांसाठी ग्रॅज्युएशन डे चे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यां मध्ये उत्साह वाढावा व त्यांना शिक्षणाप्रती प्रोत्साहन मिळावे म्हणून स्वर्णलीला स्कुल कडुन डॉ. रेड्डी सर यांच्या हस्ते परीक्षा प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.

तसेच दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी निरोप समारंभाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. यावेळी विद्यार्थ्यांतर्फे शिक्षकांसाठी व इतर विद्यार्थ्यां करिता विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. योवळी 9 वी 10 वीच्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमामध्ये उत्स्फुतपणे सहभाग घेतला होता. विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी डॉ रेड्डी यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेच्या बाबतीत महत्वपूर्ण मार्गदर्शन केले व 10 वी च्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमासाठी शाळेतील विद्यार्थ्यांनी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
वणी : बातमीदार