Home Breaking News दुःखद….. विष प्राशन करुन संपवले जीवन

दुःखद….. विष प्राशन करुन संपवले जीवन

2598
C1 20240404 14205351

पुरड (नेरड) येथील घटना

Suicide News Wani | शिरपुर पोलीस स्‍टेशनच्‍या हद्दीतील पुरड (नेरड) येथे वास्तव्यास असलेल्‍या 50 वर्षीय व्‍यक्‍तीने विषाचा घोट रिचवत जीवन संपवले. ही घटना गुरुवार दि. 25 मे ला सकाळी उघडकीस आली. A 50-year-old man ingested poison at his residence. As soon as the family members came to know about this, they immediately shifted him to the primary health center.

संभाजी (संभु )यादव बदकल (50) असे मृतकांचे नांव आहे, ते आपल्‍या परिवारांसह पुरड (नेरड) येथे वास्‍तव्‍यास होते. त्‍यांनी गुरुवारी सकाळी 9 वाजताच्‍या दरम्‍यान आपल्‍या राहत्‍या घरी विष प्राशन केले. ही बाब घरच्‍या मंडळीना कळताच त्‍यांनी त्‍याला लगेचच कायर येथील प्राथमीक आरोग्‍य केंद्रात उपचारार्थ हलवले. प्रकृती गंभीर असल्‍याने त्‍यांना वणी ग्रामीण रुग्‍णालयात हलविण्‍यात आले असता त्‍यांचा वाटेतच मृत्‍यू झाला.

संभाजी बदखल यांनी विषारी द्रव का प्राशन केले याबाबत विस्‍तृत माहिती कळू शकली नाही. परंतु त्‍यांच्या या आत्‍मघाती निर्णयामुळे परिवारांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.
Rokhthok News