Home यवतमाळ नीट (NEET)परीक्षेचे केंद्र यवतमाळ येथे द्या

नीट (NEET)परीक्षेचे केंद्र यवतमाळ येथे द्या

215

खासदार बाळू धानोरकर यांची मागणी

वणी बातमीदार :

राष्ट्रीय परीक्षा एजन्सी तर्फे घेण्यात येणाऱ्या (NEET) नीट परीक्षेसाठी महाराष्ट्रातील यवतमाळ येथे परीक्षा केंद्र देण्याची मागणी चंद्रपूर- वणी- आर्णी लोकसभा क्षेत्राचे खासदार बाळू धानोरकर यांन शिक्षण व कौशल्य विकास केंद्रीय मंत्री केंद्रीय मंत्री केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे केली आहे.

साध्यस्थीतीत यवतमाळ येथे नीट या पूर्व परीक्षेसाठी परीक्षा केंद्र नसल्यामुळे विध्यार्थ्यांसाठी गैरसोय होत आहे. यामुळे येथील विध्यर्थ्याना अकोला, अमरावती किंवा नागपूर म्हणजेच 150 ते 200 किलोमीटर अंतरावर या परीक्षेसाठी जावे लागते. गरीब विद्यार्थ्यांसाठी हे फार आर्थिक व वेळेचा अपव्यय करणारे ठरत आहे. यवतमाळ जिल्ह्यात अनुसूचित जातीची लोकसंख्या भरपूर आहे. यवतमाळ येथे नीट परीक्षेचे केंद्र मंजूर करून येथील विद्यार्थ्यांची सोय करण्यासाठीची मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी केली आहे.