Home Breaking News अखेर विद्यार्थ्यांना मिळाले शालेय वाहन

अखेर विद्यार्थ्यांना मिळाले शालेय वाहन

653

सरपंच मत्ते यांच्या प्रयत्नांना यश

वेकोली ने गावकऱ्यांचा जाण्याचा रस्ता परावर्तित करून अंतर वाढवले विद्यार्थ्यांना शाळेत जाण्याकरिता अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे पिंपळगाव चे सरपंच यांनी वेकोली प्रशासना कडे विद्यार्थ्यांना शालेय वाहन मिळण्यासाठी पाठपुराव्याला केला होता. अखेर या मागणीला  यश आले आहे.

तालुक्यातील पिंपळगाव हे वेकोली च्या कोळसा खाणीने वेढले गेले आहे. येथील गावकऱ्यांना येजा करण्याकरिता असलेला रस्ता वेकोलीने परावर्तित केला. त्यामुळे उकणी कडे जाण्यासाठी जास्त फेरा मारून जावे लागत आहे. गावातील विद्यार्थी हे शिक्षण घेण्यासाठी उकणी या गावी जातात त्यांना हा रस्ता अडचणींचा झाला आहे.

गावाच्या सभोवताल कोळशाच्या खाणी आहे.उत्खनन केलेल्या मातीचे मोठ मोठे ढिगारे रस्ताच्या कडेला आहे.या मातीच्या ढिगाऱ्यावर झाडा झुडपाच्या घनदाट जंगल तयार झाल्याने जंगली प्राण्यांचा वावर या परिसरात आहे.विध्यार्थ्यांना शाळेत जातांना जीव धोक्यात घालून शाळेत जावे लागत असल्याने वेकोली प्रशासनाने शालेय वाहन उपलब्ध करून देण्याची मागणी सरपंच दीपक मत्ते यांनी लावून धरली होती.

मागील एक वर्षापासून सातत्याने पाठ पुरावा केल्या नंतर दि 24 ऑक्टोबर ला आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार,विजय पिदूरकर, वेकोलीचे अधिकारी सुनील कुमार व सरपंच दीपक मत्ते यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत अखेर वेकोली प्रशासनाने विध्यार्थ्यांना शालेय वाहन देण्याचे लेखी आश्वासन दिले आहे.

सोमवारी शालेय वाहनाला हिरवी झेंडी दाखविण्यात आली असून यावेळी वेकोलीचे अधिकारी सुनील कुमार,अनिल हेपट ए पी ओ वणी नार्थ क्षेत्र सरपंच दीपक ऋषिकेश मते  ग्रामपंचायत सदस्य सचिन वानखेडे,कविता  मत्ते, शालेय विद्यार्थी व समस्त पिंपळगाव येथील गावकरी उपस्थित होते

वणी:बातमीदार