Home Breaking News शिक्षण प्रसारक मंडळाच्या निवडणूकीचे पडघम

शिक्षण प्रसारक मंडळाच्या निवडणूकीचे पडघम

● 11 जागेसाठी 17 उमेदवारांचे नामांकन ● 2 डिसेंबरला मतदान व मतमोजणी

1112
C1 20231125 08394940

● 11 जागेसाठी 17 उमेदवारांचे नामांकन
● 2 डिसेंबरला मतदान व मतमोजणी

Wani News |:- शिक्षण क्षेत्रात तालुक्यात अग्रस्थानी असलेल्या शिक्षण प्रसारक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणूकीचे पडघम वाजू लागले आहे. संचालक मंडळाच्या अकरा जागेसाठी 2 डिसेंबरला निवडणूक होणार आहे. 11 जागेसाठी 17 उमेदवारांनी आपले नामांकन अर्ज दाखल केले आहे. अध्यक्षपदासाठी एकास-एक तर सचिव पदासाठी तीरंगी लढत होणार आहे. Elections will be held on December 2 for eleven seats on the Board of Directors.

शिक्षण प्रसारक मंडळाकडून येथे लोकमान्य टिळक महाविद्यालय, एस पी एम. विद्यालय व औषधी निर्माण महाविद्यालय या तीन संस्था चालविल्या जातात. मंडळाचे सद्यस्थितीत 54 मतदार आहेत. अध्यक्ष पदाकरीता लक्ष्मण भेदी व विजय मुकेवार यांनी नामांकन अर्ज भरले आहे.

उपाध्यक्ष पदासाठी रमेश बोहरा व नरेन्द्र बरडीया यांच्यात लढत होणार आहे. तर सचिव पदासाठी सुभाष देशमुख, किशोर साठे व प्रा. अनिल हुड अशी तीरंगी लढत होणार आहे आणि सहसचिव पदासाठी रामदास बलकी व अशोक सोनटक्के यांच्यात लढत होणार आहे.

सदस्यांचे सहा पदासाठी सात उमेदवारांनी नामांकन अर्ज भरले आहेत. यामध्ये उमापती कुचनकार ओमप्रकाश चचडा, अनिल जयस्वाल, नरेन्द्र ठाकरे, विनायक तत्वादी, प्रमोद देशमुख, न.जो.मुणोत व सुरेश शुक्ल यांचा समावेश आहे. 54 मतदारापैकी किती मतदार मतदान करणार याकडे उमेदवारांचे लक्ष लागले आहे.

काही मतदार परदेशात आहेत, तर काही मतदार प्रकृती स्वास्थामुळे येईल की नाही अशी शंका घेतली जात आहे. 2 डिसेंबरला मतदान संपताच मतमोजणी होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अँड मिलींद निमजे तर सहाय्यक म्हणून अँड. शेखर वहाटे काम सांभाळत आहे.
Rokhthok News