Home Breaking News धारदार शस्त्र हाती नाचवत तरुणांचा धुमाकूळ

धारदार शस्त्र हाती नाचवत तरुणांचा धुमाकूळ

● लालगुडा चौपाटीवरील घटना, एक अटकेत

1259
C1 20240626 10374357
C1 20240629 20350529
Img 20240613 Wa0015

लालगुडा चौपाटीवरील घटना, एक अटकेत

Crime News | शहरालगत असलेल्या लालगुडा चौपाटीवर एक तरुण हातात धारदार शस्त्र घेवून धुमाकूळ घालत होता. ही बाब पोलिसांना कळताच डीबी पथकाने घटनास्थळी धाव घेत तरुणाला ताब्यात घेतले ही कारवाई मंगळवारी करण्यात आली. At Lalguda Chowpatty near the city, a young man was with a sharp weapon in his hand.

राजीव राधेश्याम पर्वत (24) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे, तो नविन वाघदरा येथील निवासी असून ऑटो चालक आहे. घटनेच्या दिवशी लालगुडा चौकात एका चहाच्या दुकानासमोर तो धारदार चाकू घेवून धुमाकूळ घालत होता. ही बाब गोपनीय बतमीदाराने प्रभारी अधिकारी API दत्ता पेंडकर यांना सांगितली त्यांनी विलंब न लावता स्थानिक डीबी पथकाला घटनास्थळी रवाना केले.

यवतमाळ जिल्हयामध्ये सध्या जमावबंदी व अवैद्य शस्त्र बाळगण्यास सुद्धा बंदी असल्याचा जिल्हाधीकारी यांचा आदेश आहे. असे असतांना सदर इसमाने त्याचे जवळ शस्त्र बाळगले. त्याला ताब्यात घेत असताना अटक चुकविण्याचा प्रयत्न करीत होता यामुळे पोलिसीखाक्या दाखवत ताब्यात घेण्यात आले. त्यांचे विरूद्ध शस्त्र अधिनीयम तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये कायदेशीर कार्यवाही करण्यात आली आहे.

सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे यांचे मार्गदर्शनात प्रभारी अधिकारी शंकर पांचाळ पो.स्टे. मारेगाव, सहा. पोलीस निरीक्षक दत्ता पेंडकर यांचे अधिपत्याखाली डी.वी. पथकाचे विकास धडसे, पंकज उंबरकर, विशाल गेडाम, मो. वसिम, गजानन कुडमेथे व श्याम राठोड यांनी पार पाडली आहे.
Rokhthok News

Previous article“मनसे” विधानसभा निवडणूका लढणारच..!
Next articleभरधाव कारची दुचाकीला धडक, एक ठार
Rokhthok News
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.