Home Breaking News भीषण….रेल्वेची धडक, वृद्धेचा मृत्यू

भीषण….रेल्वेची धडक, वृद्धेचा मृत्यू

● नायगाव (खुर्द)येथील घटना

1976
C1 20240404 14205351

नायगाव (खुर्द)येथील घटना

Wani News | वेडसर असलेली 72 वर्षीय वृद्ध महिला घरी कोणालाच काहीही न सांगता पहाटे साडेतीन वाजताच्या दरम्यान घरातून बाहेर पडली. नायगाव (खुर्द) रेल्वे पटरीवर तिचा सकाळी 7 वाजता मृतदेह आढळून आला. Her dead body was found at Naigaon (Khurd) railway track at 7 am.

तुळसाबाई बापूराव वरपटकर (72) असे मृतक वृद्धेचे नाव आहे, ती नायगाव (खु) येथील निवासी होती. ती वेडसर असल्याचे तिच्या नातेवाईकांनी सांगितले असून घटनेच्या दिवशी भल्या पहाटे ती घरातून निघून गेली होती.

बुधवारी सकाळी तिचा जखमीअवस्थेत रेल्वे पटरी लगत मृतदेह आढळून आला. तिला रेल्वेची धडक बसली असावी असा कयास वर्तवल्या जात असून. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे. पुढील तपास पोलीस करताहेत.
Rokhthok News