Home Breaking News Police : महामार्गावरील “त्‍या” सात ट्रकवर कारवाई

Police : महामार्गावरील “त्‍या” सात ट्रकवर कारवाई

● शिरपुर ठाणेदारांनी राबवली मोहिम ● वाहन चालकांवर गुन्‍हा नोंद

1307
C1 20231026 19181187

शिरपुर ठाणेदारांनी राबवली मोहिम
वाहन चालकांवर गुन्‍हा नोंद

Wani News | चारगांव ते शिंदोला या मार्गावरुन कोळसा व अन्‍य खनिजांचे दळणवळण अवजड वाहनातुन केल्‍या जाते. भरधाव हाकण्‍यात येणारी वाहने तसेच रस्‍त्‍यावर अस्‍ताव्‍यस्‍त उभी ठेवण्‍यात येत असलेली वाहन अपघातांस कारणीभूत ठरत असल्‍याने ठाणेदार संजय राठोड यांनी धडक मोहिम राबवली. मंगळवारी अवघ्‍या काही तासाच सात वाहनांच्‍या चालकांवर गुन्‍हे नोंद करत तंबी देण्यात आली आहे. Thanedar Sanjay Rathod launched a strike campaign as it was causing accidents.

चारगांव ते शिंदोला हा महामार्ग अतिशय रहदारीचा आहे. यामार्गावरुन कोळसा व अन्‍य खनिजांची मोठया प्रमाणात अवजड वाहनातुन वाहतुक केल्‍या जाते. बेजबाबदारपणे धावणाऱ्या वाहनांमुळे अपघाताच्‍या प्रमाणात कमालीची वाढ झाली आहे. त्‍यातच रस्‍त्‍यावर उभी करण्‍यात आलेली वाहने अपघातास कारणीभूत ठरत आहे.

ठाणेदार संजय राठोड यांनी या गंभीर बाबीकडे विशेषत्‍वाने लक्ष देत रस्‍त्‍यावरील उभ्‍या असलेल्‍या सात ट्रकच्‍या चालकांवर गुन्‍हा नोंद केल्‍याने ट्रान्‍सपोर्ट धारकांत चांगलीच खळबळ माजली आहे. मंगळवारी दुपारी एक वाजता पासुन चार वाजेपर्यंत राबविण्‍यात आलेल्‍या मोहिमेत सात ट्रक चालकांवर गुन्‍हे नोंदविण्‍यात आले आहे.

हायवा वाहन क्रमांक  RJ-21- GD- 5866 चे वाहन चालक मख्यनलिंग गोपालसिंग (27), हायवा ट्रक क्रमांक RJ-21- GD- 5956 चे चालक सुरेश देवीलालजी शर्मा (27), हायवा ट्रक क्रमांक RJ- 21-  GD-5832 चा चालक विशाल सींग सुरेंद्रसींग (46),  हायवा ट्रक क्रमांक RJ- 21-  GD- 5830 चा चालक हंसराज केवट जयरामजी (28),  हायवा ट्रक क्रमांक  RJ-21-CR- 4415 चा चालक रतनराम जिवनराम (30), ट्रक क्रमांक RJ-21 GD 7987 चा चालक गिरधारी सिंग मोहन सिंग (35) व ट्रक क्रमांक RJ-21- GB 6570 चा चालक भुपेंद्र कोल सुरधीन कोल (32) हे सर्व राजस्‍थान राज्‍यातील आहेत. त्‍यांचेवर भादवि कलम 283 अन्‍वये गुन्‍हा नोंद करण्‍यात आला आहे. सदर कारवाई ठाणेदार संजय राठोड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी सुगत दिवेकर व विजय फुल्लुके यांनी केली.
Rokhthok News