Home Breaking News Political : आमदारांच्‍या कार्यप्रणालीवर उंबरकरांचा ‘घणाघात’

Political : आमदारांच्‍या कार्यप्रणालीवर उंबरकरांचा ‘घणाघात’

● पंधरा दिवसाचा अल्‍टीमेटम, अन्‍यथा... ● शेतकरी ञस्‍त, लोकप्रतिनिधी मस्‍त

859
C1 20231026 11233595

पंधरा दिवसाचा अल्‍टीमेटम, अन्‍यथा…
शेतकरी ञस्‍त, लोकप्रतिनिधी मस्‍त

MNS WANI NEWS | मतदारसंघातील‍ शेतकऱ्यांची स्थिती अत्‍यंत बिकट आहे. विविध समस्‍येनी शेतकरी ग्रासलेला असतांना लोकप्रतिनिधी माञ मस्‍त असल्‍याचा आरोप पञपरिषदेत राजु उंबरकर यांनी केला. टोलवा टोलवी न करता पंधरा दिवसात शेतकऱ्यांच्या समस्‍येचे निवारण करावे अन्‍यथा आमदार बोदकुरवार यांचे घरावर धडक देत जाब विचारण्‍यात येईल असा अल्‍टीमेटम दिला. तसेच पञपरिषदेतुन आमदारांच्‍या कार्यप्रणालीवर घणाघाती ताशेरे ओढण्यात आले. Raju Umbarkar alleged in the press conference that the people’s representatives are happy when the farmers are suffering from various problems.

बुधवार दिनांक 25 ऑक्टोबरला उंबरकर यांनी पञपरिषद घेत सत्‍ताधारी लोकप्रतिनिधीवर आरोपांच्‍या फैरी झाडल्‍या. यावेळी बोलतांना त्‍यांनी मतदारसंघातील निर्माणाधीन रस्‍ते निकृष्‍ट दर्जाचे असुन कमीशनखोरी बोकाळल्‍याचा आरोप केला. मतदार संघातील नागरीक शास्‍वत विकासापासुन वंचित असल्‍याचे त्‍यांनी स्‍पष्‍ट केले असुन केवळ रस्‍ते म्‍हणजे विकास नव्‍हे असे उंबरकरांनी स्‍पष्‍ट केले आहे. शेतकऱ्यांसाठी महत्‍वाचा असलेला पांदण रस्‍त्‍यांचा प्रश्‍न सोडविण्‍यात काय अडचण आहे हे न उलगडणारे कोडे असल्‍याचे उंबरकर म्‍हणाले.

मतदारसंघातील शेतकऱ्यांची परिस्थिती अत्‍यंत बिकट आहे. पारंपारिक पिक पध्‍दती आर्थिकदृष्‍टया नुकसानदायक असल्‍याने शेतकऱ्यांनी मिरचीची लागवड केली माञ विज पुरवठया अभावी पिके करपल्‍याने शेतकऱ्यांसमोर गंभीर प्रश्‍न निर्माण होत आहे. नियमीत विज पुरवठा मिळत नाही तर पाच वर्षा पासुन डिमांड भरलेली असतांना अनेकांना विज मिटर लावण्‍यात आलेले नाही, सरकार शेतकरी विरोधी असल्‍याचे सकृतदर्शनी दिसत असल्‍याचे उंबरकर म्‍हणाले.

वणी उपविभागात मोठया प्रमाणात कोळशाच्‍या खाणी असुन विज निर्मीती केंद्राला विज पुरवठा करण्‍यात येतो माञ निर्मात्‍यांनाच नियमान्‍वये विज पुरवठा होवू नये हे दुर्दैवी आहे. तसेच विज वितरणचे अधिकारी सुध्‍दा मुजोर आहेत,  शेतकऱ्यांना हिन दर्जाची वागणुक देत असल्‍याचे वास्‍तव नाकारता येत नाही. अशा अधिकाऱ्याना वठणीवर आणण्‍यात येईल असा ईशारा यावेळी देण्‍यात आला.

मतदारसंघातील शासकीय कार्यालयात बहुतांश अधिकारी प्रभारावर आहेत. लोकप्रतिनिधींचे याकडे लक्ष नाहीत. सिंचनाची तजविज करतांना अनुचित घटना घडून शेतकऱ्यांचे बरे वाईट झाल्‍यास आमदारांवर सदोष मनुष्‍य वधाचा गुन्‍हा नोंदवावा लागेल असे उबंरकर यांनी स्‍पष्‍ट केले.

मतदारसंघातील शेतकरी हताश झालेला आहे. आत्‍महत्‍येच्‍या उंबरठयावर उभा आहे. तात्‍कालीन आमदाराप्रमाणेच विद्यमान आमदार निष्क्रियतेचा पाढा वाचत असेल तर महाराष्‍ट्र नवनिर्माण सेना तिव्र स्‍वरुपाचे आंदोलन करेल. तसेच शेतकऱ्यांच्या समस्‍या निकाली काढल्‍या नाहीत तर आमदारांच्‍या घरावर धडक देण्‍यात येईल असा ईशारा देण्‍यात आला आहे.

आरोप निराधार हास्यास्पद

Img 20230813 143220

वणी विधानसभा मतदार संघातील विकास कामांकरीता सर्वाधीक निधी खेचून आणण्‍यात आला. मतदारसंघात विज वितरणचे 9 सब स्‍टेशन नव्‍याने करण्‍यात आले. यात मोहदा, पुनवट, मोहोर्ली, चिखलगांव, साखरा व वणीत पाच तसेच मारेगांव व झरीत सुध्‍दा सब स्टेशन केले आहेत. यामुळे यापुढे विज पुरवठा सुरळीत होणार आहे. मतदारसंघातील मुलभूत विकास हेच ध्‍येय आहे, आजपर्यंत कोणालाच जमले नाही ते करुन दाखविल्‍याने विरोधकांची जळफळाट तर होणारच. सत्‍य काय ते मतदारांना चांगलेच कळत असल्‍याने अशा आरोपांची दखल घेणे गरजेचे नाही. हे सर्व आरोप निराधार हास्यास्पद आहेत.

संजीवरेडडी बोदकुरवार  आमदार, वणी विधानसभा