Home Breaking News फसवणूक….निवृत्त प्राचार्याला 37 लाखाचा ‘गंडा’

फसवणूक….निवृत्त प्राचार्याला 37 लाखाचा ‘गंडा’

1517

शिताफीने उकळली रक्कम, गुन्हा दाखल

वणी : आंनद नगर परिसरात वास्तव्यास असलेल्या निवृत्त प्राचार्याला पॉलिसीची रक्कम मिळवून देण्याचा बहाणा केला. अतिशय शिताफीने वारंवार फोन करून त्यांना पैसे न मिळण्याची भीती दाखवली. आणि चक्क, 36 लाख 87 हजार 630 रुपये उखळून फसवणूक केली आहे. या प्रकरणी 6 अज्ञात आरोपी विरोधात वणी पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.

महादेव मारोती घागी (67) असे फसगत झालेल्या निवृत्त प्रचार्याचे नाव आहे. ते मारेगाव येथील कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयात प्राचार्य म्हणून निवृत्त झाले आहे. त्यांनी HDFC MAX पॉलिसी काढली होती. त्यांना 27 ऑक्टोबर 2021 ला फोन आला होता यावेळी त्या संभाषण करणाऱ्या इसमाने त्यांना पॉलिसी विषयी माहिती दिली.

पॉलिसी पूर्ण झाली असून आपल्याला 4 लाख 65 हजार रुपये मिळणार असल्याचे सांगितले. परंतु आपल्याला त्याकरिता आधी 46 हजार 200 रुपये भरावे लागतील अन्यथा एजंट चे कमिशन कापून आपल्याला 3 लाख रुपये हातात येणार असल्याचे सांगितले. आपले नुकसान होऊ नये म्हणून घागी यांनी AVIAN IMPEX PVT LTD च्या खात्यात रक्कम जमा केली.

त्यानंतर भामट्याने तुमच्या पॉलिसीत एजंटच्या
वकिलाने अडचण निर्माण केल्याचे सांगून 93 हजार 930 रुपये आणखी भरायला लावले. आपल्यावर विश्वास बसल्याचे पाहून या भामट्याने त्यांना भीती दाखवणे सुरू केले फोन करून कधी इन्कम टॅक्स, जीएसटी व एवढे पैसे कुठून आणले असे म्हणत वकिलांचे नाव सांगून फोन करू लागला व वेळोवेळी पैसे उकळत होता.

महादेव घागी हे भामट्याने सांगितल्या प्रमाणे पैसे भरत गेले. त्यांनी आत्तापर्यंत 36 लाख 87 हजार 630 रुपये सांगण्यात आलेल्या ठिकाणी जमा केले. कालांतराने आपली फसगत झाल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी याबाबत वणी पोलिसात तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य बघता ठाणेदार शाम सोनटक्के यांनी 6 अज्ञात आरोपी विरोधात पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.
वणी: बातमीदार