Home Breaking News शाळेच्या डिजिटल रूमला आग, मौल्यवान वस्तू खाक

शाळेच्या डिजिटल रूमला आग, मौल्यवान वस्तू खाक

292

‘डोल डोंगरगाव येथील घटना

वणी: मारेगाव तालुक्यातील डोल डोंगरगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या डिजिटल रूमला शनिवार दि. 26 फेब्रुवारी ला मध्यरात्री भीषण आग लागली. या आगीत संगणक, 48 इंची टिव्ही, फर्निचर भस्मसात झाले.

उन्हाळ्याला सुरुवात होत असतानाच आगीचे सत्र सुरू झाले आहे. नुकतीच येथील पंचायत समितीच्या उमेद कार्यालयाला भीषण आग लागली होती. त्यात महत्वपूर्ण दस्तऐवजसह, संगणक व कार्यालयीन साहित्य खाक झाले होते.

डोल डोंगरगाव येथील शाळेच्या डिजिटल रूम मधून धूर निघत असल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. आगीने रौद्ररूप धारण करण्यापूर्वीच ग्रामस्थांनी आग विझविण्याचा कसोशीने प्रयत्न केला. परंतु या दरम्यान त्या कक्षातील महत्वपूर्ण साहित्य मात्र खाक झाले.

शाळेला आग लागताच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सदाशिव मडावी, मुख्याध्यापक दिलीप भगत, शेख चांदबी, रशीद शेख, नितीन वैद्य, सतिष मांदाडे यांच्यासह ग्रामस्थांनी आग विझविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. आग नेमकी कशी व का लागली याबाबत तर्कवितर्क लढविल्या जात असून याला सबंधितांचा बेजबाबदारपणा कारणीभूत असल्याचे मत ग्रामस्थ व्यक्त करत आहे.
वणी: बातमीदार