Home Breaking News नायगांव (खु)च्‍या संरपचावर ‘अविश्‍वास’

नायगांव (खु)च्‍या संरपचावर ‘अविश्‍वास’

● सहा विरुद्ध एक असा ठराव संमत

2081

सहा विरुद्ध एक असा ठराव संमत

Wani News | तालुक्‍यातील नायगांव (खु) येथे सात सदस्‍यीय ग्रामपंचायत आहे. मागील अनेक महिन्‍यांपासुन सरपंच यांच्‍या कार्यप्रणालीमुळे अन्‍य सदस्‍य वैतागले होते. त्‍यांनी एकञीत येत मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 35 अन्‍वये तहसिलदार यांचेकडे तक्रार दाखल केली होती. यावर आयोजित विशेष सभेत दोन्‍ही बाजुचे मत ऐकुन घेतल्‍यानंतर सरपंचावरील अविश्‍वास ठराव सहा विरुद्ध एक असा मंजुर करण्‍यात आला आहे. A complaint was lodged with the Tehsildar under Section 35 of the Mumbai Gram Panchayat Act, 1958.

नायगांव (खु) येथील सरपंच दयाशंकर शालीक मडावी यांचे विरुध्‍द उपसरपंच महादेव बापुराव वरपटकार,  सदस्‍य प्रमोद गजानन चवले, गिता विलास मेश्राम, सिंधू शंकर उपरे, अर्चना मनोज कोरडे व पार्वता हिरामण पिंपळशेंडे यांनी अविश्‍वास ठराव मांडत असल्‍याचे सुचना प्रञ तहसिलदार यांना दिले होते.

सरपंच यांचे विरुध्‍द सदस्‍यांनी अनेक आरोप केले आहेत यात प्रामुख्‍याने अधिकाराचा गैरवापर करणे, मासीक सभा न घेणे, ठरावाची अमलबजावणी न करणे, सदस्यां सोबत गैरव्यवहार करून हिशोब सादर न करणे आदी बाबींचा उहापोह करण्‍यात आला होता. याप्रकरणी तहसिलदार यांनी संपुर्ण खातरजमा व दोन्‍ही बाजुचे मत ऐकुन घेत अविश्‍वास ठराव पारीत केला आहे. यामुळे सरपंच मडावी यांना पाय उतार व्‍हावे लागणार आहे.
Rokhthok News