Home क्राईम मामाचा भाचीवर एक वर्षा पासून अत्याचार

मामाचा भाचीवर एक वर्षा पासून अत्याचार

888
C1 20240404 14205351
* कळमना येथील घटना 

वणी बातमीदार : नात्याने मामा असलेल्या 38 वर्षीय इसमाने 17 वर्षीय अल्पवयीन बलिकेवर एक वर्षांपासून अत्याचार केेला. भेदरलेल्या बलिकेने असह्य झालेल्या अत्याचाराने चक्क विष प्राशन केले आणि घटना उघडकीस आली.

प्रशांत जीवनदास जगताप (38) असे विकृत आरोपीचे नाव असून तो चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथील रहिवासी आहे. पीडित बलिकेची चुलत आत्याचा तो नवरा आहे. प्रशांत गेल्या एक वर्षांपासून राजुरा हे गाव सोडून कळमना येथे वास्तव्यास आपल्या पत्नी सह आला होता. तो पीडिताच्या घरी असलेल्या दोन खोल्या मध्ये राहत होता. नात्याने मामा  असल्याने पीडिता त्याचे जवळ जायची, याचाच फायदा या विकृत वृत्तीच्या नराधमाने उचलला. घरी कुणी नसले की टीव्ही चा आवाज मोठा करून तो बलिकेवर अत्याचार करायचा व कुणाला काही सांगितले तर तुला व तुझ्या वडीलाला मारून टाकण्याची धमकी देत होता.

पीडिता निमूटपणे तिच्यावर होत असलेला  अत्याचार सहन करीत होती. यामध्ये तीला गर्भधारणा झाली  आरोपी प्रशांत ने तिला गोळ्या खायला घालून दि 30 जून 2020 ला  तिचा गर्भपात केला होता. होणाऱ्या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला व 20 ऑगस्ट ला तिने विषारी औषध प्राशन केले.

परिवाराला ही बाब लक्षात येताच तिला वणी येथे उपचारा करिता दाखल करण्यात आले होते. मात्र प्रकृती चिंताजनक होत असल्याने पुढील उपचारासाठी तिला चंद्रपूर येथे हलविण्यात आले. तिला 24 ऑगस्ट ला रुग्णालयातुन सुट्टी मिळतच तिने परिवारासह थेट शिरपूर पोलीस स्टेशन गाठले व घडलेली हकीकत सांगितली ठाणेदार सचिन लुले यांनी कोणताही विलंब न करता गुन्ह्याची नोंद करून आरोपी प्रशांत ला अटक केली आहे. पुढील तपास पीएसआय राम कांडूरे करीत आहे.