Home Breaking News हेक्टरी 50 हजार रुपये आर्थिक भरपाई द्या

हेक्टरी 50 हजार रुपये आर्थिक भरपाई द्या

251

माकप व किसान सभेची मागणी

रोखठोक : अतिवृष्टीमुळे हतबल झालेल्या शेतकऱ्याला परतीचा पावसाने पुरते डबघाईस आणले. जीवन कसे जगावे हा त्याच्यापुढे यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे. शेतकऱ्याला सरकारने तुटपुंजी मदत जाहीर करून निव्वळ तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार केला आहे. शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये आर्थिक मदत तातडीने करण्याची मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेच्या वतीने मुख्यमंत्री यांना पाठवलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.

यावर्षी नैसर्गिक अपत्तीने शेतकरी पुरता हतबल झाला आहे. दुबार, तिबार पेरणीने शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे. अशा वेळी सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे मात्र शेतकऱ्यांची उपेक्षा करीत निव्वळ भांडवलदारांच्या खिदमतगरीत मश्गुल आहे.

शेतकरी अस्मानी संकटासोबत सुलतानी उपेक्षेचे बळी ठरत आहे. शेतकऱ्यांच्या तोंडाला निव्वळ पाने पुसल्या जात असल्याने त्याला आपल्या परिवाराचे भरणपोषण करणे कठीण जात आहे, यामुळेच नाईलाजास्तव आत्महत्या करावी लागत असल्याचे वास्तव नाकारता येत नाही.

शेतकऱ्यांना उभे करण्यासाठी त्यांना तातडीने भरीव मदत होण्यासाठी हेक्टरी 50 हजार रुपये आर्थिक मदत घ्यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. यावेळी शंकरराव दानव, कुमार मोहरमपुरी, ऍड. दिलीप परचाके, मनोज काळे, नंदकिशोर बोबडे, सुशील आडकीने यांची उपस्थिती होती.
वणी: बातमीदार