Home Breaking News ‘रंगनाथ’ च्या निवडणुकीत जय सहकारचा ‘विजय’

‘रंगनाथ’ च्या निवडणुकीत जय सहकारचा ‘विजय’

1328

ऍड. काळे यांची एकहाती सत्ता

वणी: रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची 17 संचालक पदाकरिता पार पडलेल्या निवडणुकीत जय सहकाराचा दणदणीत ‘विजय’ झाला आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सोमवारी रात्री उशिरा निकाल घोषित केला. तत्पूर्वी सर्वच उमेदवारांचे मताधिक्य अधिक असल्याने भव्य मिरवणूक काढण्यात आली होती.

विदर्भातील प्रतिथयश व विश्वसनीय पतसंस्था म्हणून लौकिकास पात्र असलेल्या श्री. रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेच्या 17 संचालक पदाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत दोन पॅनल एकमेकांसमोर उभे ठाकले होते. निवडणूक चुरशीची व तुल्यबळ होईल असे भाकीत वर्तविण्यात येत असतानाच ऍड. काळे गटाने एकतर्फी बाजी मारली.

जय सहकार च्या निवडणुकीत मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर, संजय देरकर, विजयबाबू चोरडिया, सुनील कातकडे, राकेश खुराणा, राजाभाऊ पाथ्रडकर, प्रमोद इंगोले, वसंत महाकुलकर, भय्याजी बदखल, सुरेश बनसोड, वामन कुचनकर, उमेश पोद्दार, शरद मनथनवार, भास्कर गोरे यांनी महत्वाची भूमिका पार पाडली.

जय सहकार पॅनल चे ऍड. देविदास काळे,विवेकानंद मांडवकर, सुधीर दामले, हरिशंकर पांडे, लिंगारेड्डी अंडेलवार, पुषोत्तम बद्दमवार, गोपाळराव पिंपलशेंडे, रमेश भोंगळे, सुरेश बरडे, उदय रायपुरे, अरविंद ठाकरे, घनश्याम निखाडे, परीक्षित एकरे, चिंतामण आगलावे, सुनील देठे, निमा जीवन, छाया ठाकुरवार यांनी विजय संपादन केला.

रंगनाथ स्वामी पतसंस्थेत तब्बल 36 हजार 187 सभासद मतदार असल्याने सर्वाधिक सभासदांना मतदानासाठी प्रवृत्त करणे गरजेचे होते. सभासदापर्यंत पोहचण्याचे कसब ऍड. काळे यांचेकडे असल्याने विजयाची चाहूल पहिलेच लागली होती.
वणी: बातमीदार