Home Breaking News त्या…नदी काठावरील कोंबड बाजारावर ‘धाड’

त्या…नदी काठावरील कोंबड बाजारावर ‘धाड’

1538

दोन लाखाचा मुद्देमाल जप्त

शहरातील खरबडा मोहल्ला परिसरातील निर्गुडा नदीचे काठावर बुधवारी कोंबड बाजार सुरू होता. प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी धाड टाकून तिघांना ताब्यात घेतले तर एक संशयित आरोपी फरार झाला आहे. या कारवाईत दोन लाखाचा मुद्देमाल जप्त करून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

शेतकऱ्यांचे पीक आता हातात आले आहे त्यामुळे अवैध धंदे सुरू करण्याचे मनसुबे आखल्या जात आहे. मात्र पोलीस प्रशासन अलर्ट असल्याचे होत असलेल्या करवाया वरून दिसत आहे.

खरवडा मोहल्लातील निर्गुडा नदीचे काठावरील झाडा झुडपात कोंबड्यांची झुंज लावून जुगार सुरू असल्याची माहिती ठाणेदार श्याम सोनटक्के यांना मिळाली होती. त्यावरून पोलिसांनी सापळा रचून धाड टाकली असता कोंबड्यांची झुंज सुरू असल्याचे निदर्शनास आले.

संतोष शामराव ताजणे (38), रा. चारगाव, प्रविण पांडुरंग वाभिटकर (42) सुनिल गंगाराम पिदुरकर (47), रा. वणी, शेख मुजीब शेख हामीद (48) रा. वागदरा यांना ताब्यात घेण्यात आले असून सुरेश कावरे हा फरार झाला आहे.

या कारवाईत पोलीसांनी 03 झुंजीचे कोंबडे, 2 लोखंडी धारदार काती, एक मोबाईल, 05 मोटार सायकल व रोकड असा एकुण 2 लाख 2 हजार 150 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

सदर कारवाई पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील-भुजबळ, अप्पर पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे, उप विभागीय पोलीस अधिकारी संजय पुजलवार यांचे मार्गदर्शनात ठाणेदार श्याम सोनटक्के यांचे आदेशावरून सपोनि माया चाटसे, सपोनि आनंद पिगळे, डोमाजी भादीकर, सुदर्शन वानोळे, अशोक टेकाळे, हरीन्द्रकुमार भारती, पंकज उंबरकर, विशाल गेडाम, शंकर चौधरी यांनी केली.
वणी: बातमीदार