Home Breaking News धडाका…..दहा कोटी रुपयांचा निधी रस्ता काँक्रीटीकरणासाठी

धडाका…..दहा कोटी रुपयांचा निधी रस्ता काँक्रीटीकरणासाठी

1942
Img 20240613 Wa0015

वणीची वाटचाल विकासाच्या दिशेने
आ. बोदकुरवार यांच्या प्रयत्नाला यश

रोखठोक |: शहरातील महत्वपूर्ण असणाऱ्या अंतर्गत मार्गाची अवस्था बिकट झाली आहे. खडतर रस्त्यावरून मार्गक्रमण करताना नागरिकांना होणाऱ्या यातना लक्षात घेता आ. संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी हिवाळी अधिवेशनात निधीची मागणी केली. नगर विकास  विभागाने 26 डिसेंबरला परिपत्रक काढून नागरी सेवा व सुविधेच्या कामाकरिता दहा कोटी मंजूर केले आहे.

निधी बाबत तीन वर्षांपूर्वी झालेल्या सत्तांतरानंतर लागलेला ब्रेक आता सैल झाला आहे. भाजपा- शिंदेंसेना सरकार आमदारांच्या मतदारसंघातील विकास कामा बाबत सतर्क झाल्याचे दिसत आहे. मागील कार्यकाळात होणारी निधीची अडवणूक आता बंद झाली आहे. आ. बोदकुरवार यांनी विकास कामासाठी निधीचा “धडाका” लावला आहे.

नुकतेच नगर विकास विभागाच्या माध्यमातून नागरी  सेवा व सुविधेच्या कामाकरिता नगरपालिकेला 10 कोटी रुपये वितरित करण्याचे आदेश देण्यात आले आहे. मात्र त्याकरिता काही अटी शर्थी निर्धारित करण्यात आल्या आहेत. तसेच अवघ्या दोन महिन्यांच्या आत प्राप्त निधीतून आमदारांनी नमूद केलेली विकास कामे करण्यात येणार आहे.

टिळक चौक ते दीपक चौपाटी व टूटी कमान ते काठेड ऑइल मिल पर्यंत चा रस्ता, सिमेंट काँक्रीटीकरण बाबतचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. निधीची उपलब्धता झाली आहे, आता तांत्रिक बाबी लवकरात लवकर पूर्ण करून तडकाफडकी कामाला सुरुवात होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

नगरविकास विभागातून विविध विकास कामाकरिता निधी खेचून आणल्यानेच शहर विकासाला चालना मिळाली आहे. शहरातील उद्याने, अंतर्गत रस्ते काँक्रीटीकरण, नाट्य संकुल आणि अतिशय महत्वपूर्ण असलेली पाणी पुरवठा योजना अस्तित्वात आल्यात. यापुढे सुध्दा शहरातील नागरिकांना मूलभूत सोयी  सुविधा  उपलब्ध  व्हाव्यात या करिता कटिबद्ध असल्याचे आ. बोदकुरवार यांनी सांगितले.
वणी : बातमीदार

C1 20240529 15445424