Home Breaking News लायन्स हायस्कूलचे घवघवीत यश

लायन्स हायस्कूलचे घवघवीत यश

● यशस्वी विद्यार्थी व पालकांचे अभिनंदन

364
C1 20240529 09113241
Img 20240613 Wa0015

● यशस्वी विद्यार्थी व पालकांचे अभिनंदन

Wani News | येथील वणी लायन्स चॅरीटेबल ट्रस्ट द्वारा संचालीत वणी लायन्स इं. मिडी. हायस्कुल ना मार्च (2024) इयत्ता दहावीच्या निकाल 99.44 टक्के लागला असून, विद्याथ्यांनी या वर्षी शालेय प्रमाणपत्र परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. The students have achieved great success in the School Certificate Examination this year.

दहावीच्या परीक्षेत सौरभ चंद्रकांत ठाकरे या विद्यार्थ्यांने (94:60) टक्के गुण संपादन करून शाळेतून प्रथम क्रमांक व वणी तालुक्यातुन दुसरा क्रमांक पटकाविला आहे. तसेच मानसी लीपटे (93:40) टक्के, यथार्थ छल्लानी (93)टक्के, हर्षा वाभीटकर (92:80)टक्के, आकांक्षा दयालाल निकुंबे (92:80), एकलव्य जयप्रकाश बल्की (92), यशस्वी रणजीत कोडागे (91:80), मंथन अजय हेगन (91), शिव संतोष नेबुंडे (90:80), भाग्यश्री दिलीप डाखरे (90:60), अनुष्का अभय भुजाडे (90:60), अर्णव चेताराम खाडे (90), यांनी गुणानुक्रमे क्रमांक पटकावले. शाळेतून 69 विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्यासह, 75 विद्यार्थी प्रथम श्रेणीत, तर 29 विद्यार्थीनी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण होवून यश प्राप्त केले.

संस्थेचे अध्यक्ष तथा आमदार संजीवरेडडी बोदकुरवार, उपाध्यक्ष बलदेव खुंगर, सचिव सुधीर दामले, कोषाध्यक्ष चंद्रकांत जोबनपुत्रा, सदस्य शमीम अहेमद, नरेंद्रकुमार बरडीया, किशन चौधरी, महेंद्रकुमार श्रीवास्तवा, राजाभाऊ पाथ्रडकर, लायन क्लब वणी व वाणी लायन्स चॅरिटेबल ट्रस्टचे सन्माननीय पदाधिकारी व सदस्यानी, तसेच शाळेचे प्राचार्य प्रशांत गोडे, वणी लायन्स वरिष्ठ विज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्य दिगासिहं परिहार, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थी व पालकांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्वल भविष्याकरिता शुभेच्छा दिल्या.
Rokhthok News

C1 20240529 15445424