वणी :- ओबीसी जातनिहाय जनगणना कृती समिती, वणी, झरी, मारेगाव च्या वतीने सावित्रीआई फुले जयंती दिनी “खुली वक्तृत्व स्पर्धा” आयोजित करण्यात आली आहे.
‘ओबीसी जातनिहाय जनगणना काळाची गरज’ हा स्पर्धेचा विषय असून खुल्या गटात ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रवेश नि:शुल्क असणार आहे. विजेत्या स्पर्धकांना पाच बक्षीशे देण्यात येणार आहेत. प्रथम ₹ 3000/-, द्वितीय ₹ 2000/-, तृतीय ₹ 1000/- आणि प्रोत्साहनपर दोन ₹ 500/- याप्रमाणे रोख रक्कम व गौरव चिन्ह देण्यात येईल तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र मिळणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पर्धकांनी वैभव ठाकरे 7709473091, प्रदिप बोरकुटे 8788703302, प्रा.राम मुडे -9823178591, विकास चिडे 7744929747 आणि गजानन चंदावार-8888422662 यांच्याशी स्पर्धेत सहभागी होण्याच्या अंतिम तारखेपर्यंत संपर्क करावा. ही वक्तृत्व स्पर्धा 3 जानेवारी 2021 ला दुपारी 2 वाजता ज्ञानदा स्पर्धा परीक्षा केंद्र, सार्थक लॉन, गुरूनगर वणी येथे होणार आहे. तरी जास्तीतजास्त स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
वणी : बातमीदार