Home Breaking News जिनिंगला भिषण आग, शेकडो क्विटंल कापुस खाक

जिनिंगला भिषण आग, शेकडो क्विटंल कापुस खाक

● वणी घुग्‍गूस मार्गावरील घटना ● सीसीआयचा कापुस असल्‍याची चर्चा

1840
C1 20240130 21134605

वणी घुग्‍गूस मार्गावरील घटना
सीसीआयचा कापुस असल्‍याची चर्चा

Wani News: शहरातील घुग्‍गूस मार्गावर असलेल्‍या नगरवाला जिनिंग मध्‍ये मंगळवार दिनांक 30 जानेवारीला दुपारी भिषण आग लागली. या घटनेत शेकडो क्विंटल कापुस बेचिराख झाला. आग लागताच संबधीत जिनिंग मध्‍ये आग विझविण्‍याची कोणतीही व्‍यवस्‍था नसल्‍याचे प्रसारीत झालेल्‍या व्हिडीओ मधुन स्‍पष्‍ट होत असुन सीसीआय च्‍या कापसाची खरेदी संबधीत जिनिंग मध्‍ये करण्‍यात येत असल्‍याचे बोलल्‍या जात आहे. A massive fire broke out in Nagarwala Ginning on Tuesday afternoon, January 30.

वणी घुग्गुस मार्गावर नगरवाला जिनिंग आहे, तेथे (cci) सीसीआयच्‍या कापसाची खरेदी करण्‍यात येते. घटनेच्‍या दिवशी दुपारी गोडावुन मध्‍ये ठेवलेल्‍या कापसाने पेट घेतला तो नेमका कशामुळे हे अद्याप अस्‍पष्‍ट असले तरी शेकडो क्विंटल कापुस राख झाल्‍याचे विश्‍वसनिय वृत्‍त आहे.

घडलेल्‍या घटनेबाबत नगरवाला जिनिंगचे संचालक तुषार नगरवाला यांचे सोबत संपर्क साधला असता त्‍यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्‍यास नकार दिला. तर सीसीआय चे अधिकारी हेमंत ठाकरे यांनी कॉल “रिसिव्ह” केला नाही. याचाच अर्थ त्यांना घटनेचे गांभीर्य नसल्याचे अधोरेखित होत आहे.

जिनिंग मध्‍ये आग लागल्‍यावर तेथील कर्मचारी आग विझविण्‍याचा प्रयत्‍न करत होते. परंतु त्‍यांच्‍या संभाषणावरुन त्‍या ठिकाणी पाण्‍याची व्‍यवस्‍था नसल्‍याचे त्‍या व्हिडीओ मधुन ऐकायला येत आहे. यामुळे संबधीत जिनिंगधारक किती तत्‍पर आहेत हे यावरुन स्‍पष्‍ट होत आहे.
Rokhthok News