Home Breaking News tiger attack…..आई समोरच बालकाला वाघाने नेले उचलून

tiger attack…..आई समोरच बालकाला वाघाने नेले उचलून

● चंद्रपूर जिल्ह्यातील मनसुन्न करणारी घटना

2259

चंद्रपूर जिल्ह्यातील मनसुन्न करणारी घटना

रोखठोक | पाच वर्षाचं बालक घरा समोरील अंगणात शौचास बसलं होतं. त्याची आई लगतच उभी होती, आणि क्षणात वाघाने झडप घातली व बालकाला उचलून नेले. ही मन सुन्न करणारी घटना बुधवारी सायंकाळच्या सुमारास घडली. A tiger suddenly attacked a five-year-old boy.

हर्षद संजय कारमेंगे (5) रा. बोरमाळा असे दुर्दैवी बालकाचे नाव आहे. सावली वनपरिक्षेत्रातील पाथरी उपक्षेत्रांतर्गत येणाऱ्या गेवरा बिटातील बोरमाळा येथे ही खळबळजनक घटना घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

चिमुकल्या हर्षदला शौचास लागल्याने त्याची आई अतिक्षा हिने त्याला घरा समोरील अंगणात शौचाला बसवले व ती बाजूलाच उभी होती. लगतच दबा धरून बसलेल्या वाघाने झडप घातली आणि आईच्या डोळ्यासमोर हर्षद ला उचलून नेले.

अचानक घडलेल्या घटनेने ती माता कमालीची घाबरली तिने आरडाओरडा केला. शेजारी धावतच आले मात्र तोपर्यंत वाघाने बालकाला नेले होते. नागरिकांनी परिसरात शोधाशोध केली. परंतु मुलाचा शोध लागला नाही. या प्रकरणी पाथरी पोलिसांना व वनविभागाला घटनेची माहिती देण्यात आली.

घटनेचे गांभीर्य बघून पोलीस व वन विभागाचे अधिकारी पथकासह दाखल झाले. त्यांनी संयुक्तरित्या शोधमोहीम राबवली. अंधार झाल्याने शोधमोहिमेत अडथळा येत होता. यावेळी सावलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी RFO प्रवीण विरूरकर, पाथरीचे क्षेत्र सहायक एन. बी. पाटील, सावलीचे क्षेत्र सहायक राजू कोडापे, पाथरीचे ठाणेदार मंगेश मोहोड घटनास्थळी उपस्थित होते.
चंद्रपूर: बातमीदार