Home Breaking News दारूसाठी झाला वाद, कोयत्याने केले त्याला बाद

दारूसाठी झाला वाद, कोयत्याने केले त्याला बाद

● शाब्दिक खडाजंगीतुन घडला थरार

1175
C1 20240404 14205351

शाब्दिक खडाजंगीतुन घडला थरार

Crime News Maregaon | मारेगाव तालुक्यातील कोसारा येथे क्षुल्लक कारणावरून दोघात वाद झाला. वादाचे रूपांतर शाब्दिक खडाजंगीत झाले. त्या दोघांतील एकाने खलबत्ता उचलला व डोक्यात हाणला तर कोयत्याने सपासप वार केले. यात 50 वर्षीय व्यक्तीचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही थरारक घटना शुक्रवार दि. 30 जूनला सकाळी घडली. A 50-year-old man died on the spot. This exciting incident took place on Friday. It happened on the morning of June 30.

सुभाष संभाजी पचारे (50) असे मृतकाचे नाव आहे. मोलमजुरी करून तो उपजीविका करत होता. त्यांचा परिवार बऱ्याच वर्षांपासून चंद्रपूर जिल्ह्यात वास्तव्यास आहे. तर मोहन देविदास पचारे (29) असे आरोपीचे नाव असून तो कोसारा येथील निवासी आहे.

घटनेच्या दिवशी मृतक सुभाष व मोहन हे दोघे सकाळपासून तराट झाले होते. दोघांनी चांगलीच ढोसली होती. त्यातच पुन्हा पिण्यासाठी पैश्यावरून त्यांच्यात शाब्दिक वाद झाला. वादाचे रूपांतर भयानक कृत्यात झाले. मोहन याने लगतच असलेला दगडी खलबत्ता उचलला व सुभाष च्या डोक्यात हाणला तर कोयत्याने सपासप वार केले.

या थरारक घटनेत सुभाषचा जागीच मृत्यू झाली. ही वार्ता वाऱ्यासारखी गावात पसरली, लोकांनी एकाच गर्दी केली. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठत मृतदेहाचा पंचनामा केला व उत्तरीय तपासणीसाठी शव पाठविण्यात आले. याबाबत हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Rokhthok News