Home Breaking News धक्कादायक…17 वर्षीय बलिकेवर लादले ‘मातृत्व’

धक्कादायक…17 वर्षीय बलिकेवर लादले ‘मातृत्व’

1760

आरोपी पोलिसांच्या ताब्यात

घरा शेजारीच राहणाऱ्या 25 वर्षीय युवकाने बलिकेच्या आज्ञानाचा फायदा घेऊन तिचे शारिरीक शोषण केले. यामुळे ‘ती’ 7 महिन्याची गर्भवती राहिली. तिच्या पालकांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी केल्यामुळे मातृत्व लादल्याची घटना उघडकीस आली असून शिरपूर पोलिसांनी गुन्हा नोंद करून आरोपीला अटक केली आहे.

अविनाश वारलुजी टेकाम (25)असे आरोपीचे नाव आहे. त्याचे मुळगाव वडजापुर असून तो कामानिमित्ताने परिसरातील एका गावात वास्तव्यास आहे. पीडित बालिका वणी येथील एका शाळेत इय्यता 10 व्या वर्गात शिक्षण घेत असून ती हनुमान नगर येथील रहिवाशी आहे. घरा शेजारी असलेल्या अविनाश ने तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले. गेल्या वर्षभरा पासून लग्नाचे आमिष दाखवून तिचे शारीरिक शोषण करण्यात आले.

यामध्ये तिला सात महिन्याची गर्भधारणा झाली. मुलींमध्ये शारीरिक बदल होत असल्याने तिच्या आई वडिलांनी तिला शिंदोला येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी केली असता तिला सात महिन्याची गर्भधारणा असल्याचे निष्पन्न झाले. तिच्या पालकांनी तिला विश्वासात घेऊन विचारणा केली असता तिने अविनाश चे नाव सांगितले.

शिरपूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार गजानन करेवाड यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ गुन्हा नोंद करून अविनाश ला ताब्यात घेतले आहे. सदर बलिकेला 2004 मध्ये दाम्पत्याने दत्तक घेतले होते. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राम कांडूरे हे करीत आहे.

वणी: बातमीदार