Home Breaking News आरोपी मोकाट…मृत्यू एक प्रश्न अनेक, घातपात, अपघात की हत्या..!

आरोपी मोकाट…मृत्यू एक प्रश्न अनेक, घातपात, अपघात की हत्या..!

226
Img 20240613 Wa0015

गूढ कायम, तपास कासवगतीने

वणी: तब्बल वीस दिवस झालेत त्या संशयास्पद मृत्यूचे गूढ उकलण्यात तपास यंत्रणा सपशेल अपयशी ठरल्या आहेत. आठ मार्चला तो बेपत्ता होतो, दहा तारखेला दोनशे किलोमीटर अंतरावर त्याचा संशयास्पद मृतदेह आढळतो, चौदा तारखेला मृतकाची पत्नी घातपाताचा संशय व्यक्त करते आणि तपास यंत्रणा अद्याप ठोस भूमिकेकडे पोहचत नसल्याने मृत्यू एक प्रश्न अनेक निर्माण झाले आहेत.

संतोष रामदास गोमकर (47) राहणार जुने कॉटन मार्केट हा तरुण महा मिनेरल माईनिंग प्रा. लि. नागपूर या कंपनीत पिंपळगाव प्लांट वणी सायडिंग या ठिकाणी कोल सायडिंग, हॅन्डलींग सुपरवायझर या पदावर कार्यरत होता. दि. आठ मार्चला तो रात्री नेहमी प्रमाणे कर्तव्यावर गेला तो परतलाच नाही.

कोराडी जि. नागपूर येथील थर्मल पॉवर प्लॉन्ट चे सायडिंगवर कोळसा रेल्वे वॅगन मध्ये कोळशाच्या ढिगाऱ्यात दि. 10 मार्चला संतोष यांचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळला. महा मिनेरल माईनिंग या कंपनीत वणी सायडिंग वर कर्तव्य बजावतअसलेल्या तरुणाचा मृतदेह दोनशे किलोमीटर अंतरावरील थर्मल पॉवर प्लॉन्ट कोरडीच्या सायडिंगवर आढळणेच संशयास्पद आहे.

संतोषचा मृत्यू नैसर्गीक नव्हता, पोटावरील भाग जळालेला अवस्थेत होता तर जिभ बाहेर निघालेली होती आणि मृतदेहाच्या कानातुन रक्त बाहेर निघालेले होते. असा स्पष्ट आरोप पत्नी सुवर्णाने तक्रारीतून केल्याने त्या घटनेचे गूढ वाढले आहेत. तर रेल्वे सायडिंगवर हत्याकरुन त्यांच्या मृतदेहाची मारेकऱ्यांनी विल्हेवाट लावली असा कुटूंबियांचा आरोप आहे.

घटना घडून 20 दिवसांचा कालावधी लोटला तरी तपास कोणते पोलीस ठाणे करेल यावरच निर्णय होत नाही. कोराडी पोलीस यांनी वणी पोलीस यांचेकडे तपास दिला, वणी पोलीस यांनी पुन्हा कोराडी पोलीसकडे तपास पाठविला. त्यानंतर कोराडी पोलीस यांनी रेल्वे पोलीसकडे तपास वर्ग केला अशी माहिती असून तपास यंत्रणा त्या कंपनीच्या दबावाखाली तर वावरत नाही ना असा आरोप काँग्रेस कमिटीने SDO व महानिरीक्षक रेल्वे मंडळ याना दिलेल्या निवेदनातुन केला आहे.

घातपात, अपघात की हत्या, मृत्यू एक प्रश्न अनेक उपस्थित होत आहे. तपासामध्ये दिरंगाई होत असुन कुठेतरी पाणी मुरत असल्याचा आरोप काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनातून केला आहे. तरी संतोष च्या मृत्यूचे गूढ उकलून गोमकर परिवाराला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे.
वणी: बातमीदार

C1 20240529 15445424