Home यवतमाळ भुमीपूजन, लोकार्पणा बाबत ‘राजशिष्टाचार’ पाळा

भुमीपूजन, लोकार्पणा बाबत ‘राजशिष्टाचार’ पाळा

346
Img 20241016 Wa0023

वणी बातमीदार:

प्रशासनाचा पालिकेला ‘दणका’

वणी शहरात नगर पालिकेने ठिकठिकाणी शुद्ध पेयजल केंद्राची उभारणी केली आहे. पालिकेतील सत्ताधारी भाजपाने भुमीपूजन किंवा लोकार्पण करताना राजशिष्टाचार (प्रोटोकॉल) पाळला नाही. यामुळे प्रशासनाने पालिकेसह अन्य विभागाला शासन परिपत्रकाचे पालन करण्याचा सूचना वजा आदेश दिले आहे.

शहरात खनिज विकास निधी अंतर्गत शुद्ध पेयजल केंद्राची उभारणी करण्यात येत आहे. विद्यमान लोकप्रतिनिधी सोबतच माजी खासदारांचे छायाचित्र केंद्रावर लावण्यात आले आहेत. शासकीय कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिका व भुमीपूजन किंवा लोकार्पण बाबत सामान्य प्रशासन विभागाने शासन परिपत्रक निर्गमित करून राजशिष्टाचार (प्रोटोकॉल) बाबतची नियमावली जाहीर केली आहे. त्या शासन परिपत्रकाच्या आदेशाला पालिकेने हरताळ फासला आहे.

वणी नगर परीषद क्षेत्रात खनिज विकास निधी अंतर्गत शुध्द पेयजल केंद्रे उभारण्यात आली आहेत. या पेयजल केंद्रावर चंद्रपूर वणी-आर्णी लोकसभा क्षेत्राचे माजी खासदार हंसराज अहीर यांचे छायाचित्र टाकण्यात आले आहे. राजशिष्टाचार (प्रोटोकॉल) नुसार विद्यमान खासदार बाळू उर्फ सुरेश धानोरकर यांचे छायाचित्र व निमंत्रण पत्रिकेत नाव असणे अपेक्षित होते. ही बाब प्रशासनाला अवगत होताच जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या आदेशानुसार निवासी उपजिल्हाधिकारी ललीतकुमार वऱ्हाडे यांनी दि. 22 जुलै ला सर्व विभागाला आदेशीत करून शासन परिपत्रक निर्णयाचे काटेकोर पालन करण्यात यावे, सदर कामात कोणत्याही प्रकारची हयगय खपवून घेणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे आता पालिकेला प्रोटोकॉल पाळत नियमाची अंमलबजावणी करावी लागेल.