Home देश-विदेश महाराष्ट्रात पेट्रोल, डिझेलवरचा व्हॅट अंदमान निकोबार पेक्षा 7 पट अधिक

महाराष्ट्रात पेट्रोल, डिझेलवरचा व्हॅट अंदमान निकोबार पेक्षा 7 पट अधिक

164
Img 20240930 Wa0028

 

खा धानोरकर यांनी विचारलेल्या प्रश्नां वरून माहिती उघड
वणी बातमीदार :-महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेल वर आकारण्यात येणारे व्हॅटचे दर 29.55 रुपये आहेत.व्हॅटचे हे दर अंदमान निकोबार मध्ये आकारण्यात येणाऱ्या व्हॅटच्या सातपट आहेत, अशी माहिती पेट्रोलियम विभागाचे राज्य मंत्री रामेश्वर तेली यांनी दिलेल्या आकडेवारीतून समोर आली. संसदेत खासदार बाळू धानोरकर यांनी याविषयी प्रश्न विचारला होता.

राज्य शासनाच्या वतीने आधार मूल्य, केंद्रीय कर आणि राज्यांची गरज या गोष्टींवर व्हॅटचे दर निश्चित करतात. पेट्रोल आणि डिझेल वर आकारण्यात येणाऱ्या व्हॅटचे दर हे त्या त्या राज्यांकडून ठरविण्यात येतात. 22 जुलै 2021 नुसार अंदमान निकोबार मध्ये पेट्रोल वर आकारण्यात येणाऱ्या व्हॅटचे दर 4.89 रुपये आहेत तर महाराष्ट्रात हे दर 29.55 रुपये आहेत. राजस्थान मध्ये हे दर 29.85 रुपये आणि मध्य प्रदेशमध्ये 31.55 रुपये इतका दर आकारला जातो. तर डिझेल वर अंदमान निकोबार मध्ये आकारण्यात येणारे व्हॅटचे दर 4.74 रुपये आहेत तर राजस्थान मध्ये हेच दर 27.88 इतके आहे

सध्या पेट्रोल वर लागू करण्यात येणारा केंद्रीय उत्पादन शुल्क कर 32.90 रुपये डिझेल वर 32.80 रुपये कर आकारला जातो. पेट्रोल वरील क्षुल्लक विक्री कर एकूण उत्पादन क्षुल्लक कराच्या 32.4 टक्के आकारला जातो तर डिझेलवरील क्षुल्लक विक्री कर 35.4 टक्के इतका आकारला जातो.

पेट्रोल डिझेलचे आंतरराष्ट्रीय दर आणि डॉलर आणि रुपयाची किंमत यानुसार पेट्रोल डिझेलचे दर वाढविले किंवा कमी केले जातात, असे स्पष्टीकरण ही यावेळी देण्यात आले.