Home राजकीय शिवसंपर्क मोहिमेतून शिवसेना पोहचली घरात घरात …विश्वास नांदेकर

शिवसंपर्क मोहिमेतून शिवसेना पोहचली घरात घरात …विश्वास नांदेकर

258

 

शिव संपर्क मोहिमेचा समारोप

वणी बातमीदार:- शिवसेना कार्याध्यक्ष,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्रात दि 12 जुलै ते 24 जुलै पर्यंत नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी शिवसंपर्क मोहीम राबिवले. यामध्ये वणी व पांढरकवडा विभागात 42 ठिकाणी आढावा बैठका लावून नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या. त्यामुळे शिवसेना घराघरात पोहचली असल्याचे मत जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार  विश्वास नांदेकर यांनी मोहिमेच्या समारोपीय कार्यक्रमात व्यक्त केले.

यावेळी व्यासपीठावर शिवसेनेचे संपर्कप्रमुख विजयानंद पेडणेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र गायकवाड, हरिहर लिंगमवार, उपजिल्हा प्रमुख संजय निखाडे, प्रवीण पांडे, संतोष माहूरे उपस्थित होते या मोहिमेत शिवसैनिकांनी गावागावात जाऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या. कृषी कर्ज, कोविड लसीकरणबाबतही आढावा घेण्यात आला शेतकरी मंदिर सभागृहात आयोजित समारोपीय कार्यक्रमात शेकडो कार्यकर्त्या सह युवा सेनेचे जिल्हाप्रमुख विक्रांत चचडा, रवी बोढेकर, गणपत लेडांगे, बाळू सोमलकर, महेश चौधरी, प्रशांत बलकी, महेश चौधरी, अजय चन्ने, युवा सेना शहरप्रमुख बंटी येरणे, नीलेश करडभुजे, चंद्रकांत घुगुल उपस्थित होते. संचालन अजय नागपुरे यांनी केले.