*वाढदिवस साजरा करतांना मालविली प्राणा सह मेणबत्ती ज्योत …
*ज्येष्ठ पत्रकार नरेंद्र वैरागडे यांना पितृशोक
मारेगाव बातमीदार-दीपक डोहणे: वार्धक्यात असलेले बाबा..80 वा जन्मदिवस साजरा करण्याची सर्वांची धडपड..हा कार्यक्रम आनंददायी करण्यासाठी मुले, मुली, जावई,नातवंड एकत्र येऊन केक सह पुष्पगुच्छ व फराळाची व्यवस्था समीप पावली..कार्यक्रमाची वेळ ठरली ..सर्वच कुटुंब एकत्र आली..परित्राण पाठ सुरू झाले..बुद्ध वंदना झाली.. गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन पार पडले..अगरबत्ती..मेणबत्ती प्रज्वलीत झाली..आणि मेणबत्ती सह माजी मुख्याध्यापक श्रीराम वैरागडे यांचा प्राण ऐन जन्मदिनी मालविला..हा काहीसा आनंदावर विरजण आणणारा प्रसंग मारेगाव येथील प्रभाग क्रमांक १७ मध्ये घडला. या वेदनादायी प्रसंगाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
जन्म आणि मरण यातील काळ म्हणजे जीवन हे सर्वश्रुत आहे. मात्र ‘काळ’ हा कुणावर कसा आघात करेल याबाबत सर्वच अनभिज्ञ आहे. असाच वास्तव मध्ये प्रसंग मारेगाव येथील प्रभाग क्रमांक सतरा मध्ये घडला. अतिशय सालस व्यक्तिमत्त्व म्हणून सुपरिचित असलेले श्रीराम वैरागडे गुरुजी यांचा दिनांक 6 आगष्ट रोजी वाढदिवस.वयाची 79 पार करून 80 व्या वर्षात पदार्पण करतांना त्यांचा वाढदिवस साजरा करण्याचा बेत मुला मुलीनी आखला आणि जावई नातवंडासह एकत्र आले. वाढदिवसाची सर्वच सोपस्कार पार पाडून अखेरची मेणबत्ती प्रज्वलित करून बाबांना दीर्घ व निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा प्रदान करण्याची समीप घटका काही क्षणात असतांना बर्थ डे ची मेणबत्ती विझताच बाबांनी जन्मदिनी कायम डोळे मिटले अन एकच हंबरडा फुटला.
जन्मदिनी प्राण त्यागल्याची दुर्देवी घटना वैरागडे कुटुंबियांवर ओढवली.श्रीराम गंगाराम वैरागडे असे या जन्मदिनी मृत्यू पावलेल्या सेवानिवृत्त शिक्षकाचे नाव.सन 2021 मध्ये मारेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतून सेवानिवृत्त होतांना त्यांनी काष्ट्राईब शिक्षक संघटनेचे पदाधिकारी म्हणून कार्य केलेत. सत्तर ते नव्वद च्या दशकात त्यांनी सार्वजनिक वाचनालयाचा कारभार चालविला. आंबेडकरी चळवळीशी त्यांचा विशेष सहभाग असतांना सेवानिवृत्ती नंतर त्यांची रिपब्लिकन खोब्रागडे गटाशी नाळ जुळली होती.
दरम्यान ऐन जन्मदिवसाला त्यांच्यावर नियतीने डाव साधल्याचा योग आच्छर्यचकीत व वेदनादायक असून त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, व ज्येष्ठ पत्रकार नरेंद्र सह जावई व नातवंड आहे. शनिवार ला सकाळी दहा वाजता त्यांच्यावर मारेगाव येथे अंतिम संस्कार करण्यात येणार असल्याची माहिती कुटुंबियाकडून देण्यात आली