Home क्राईम अवैध व्यवसाया विरोधात पोलिसांचे ‘सर्च ऑपरेशन’

अवैध व्यवसाया विरोधात पोलिसांचे ‘सर्च ऑपरेशन’

302

अनेक ठिय्ये केले उध्दवस्त 

Img 20250422 wa0027

वणी बातमीदार: वणी पोलीस स्टेशन हद्दीत लपून छपून वरली मटका,दारू विक्री सुरू असल्याचे बोलल्याजात होते. अनेकदा अवैद्य धंद्याबाबत होत असलेल्या तक्रारीची चाचपणी पोलिसांनी केल्यानंतर शनिवार दि. 7 ऑगस्ट ला सर्च ऑपरेशन राबवून अवैध व्यवयाईकांचे ठिय्ये उध्दवस्त केले आहे.

Img 20250103 Wa0009

जिल्हा पोलिस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ हे जिल्ह्यात रुजू होताच त्यांनी अवैध धंद्या विरोधात कंबर कसली आहे. जिल्ह्यातील ठाणेदारांना अवैध धंदे खपवून घेतले जाणार नाही असे आदेश दिले होते. त्यामुळे काही प्रमाणात या व्यवसायाला लगाम लागल्याचे दिसत आहे. मात्र “जित्याची खोड मेल्या शिवाय जात नाही ” या म्हणी प्रमाणे विविध प्रकारच्या शक्कल लढवून अवैध व्यावसायिक आपले मनसुबे पूर्ण करतांना दिसत होते.

वणी तालुका हा आर्थिक दृष्ट्या परिपूर्ण परिसर म्हणून ओळखल्या जातो .या भागात असलेल्या कोळसा खाणी मुळे परप्रांतीय कामगारांचा भरणा मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळेच अवैद्य व्यवसायाचा पसारा वाढतगेल्याचे सकृतदर्शनी दिसते. काही दिवसांपासून पुन्हा अवैध व्यवसायाने डोके वर काढले होते मात्र गेल्या वर्षभरा पासून वणी पोलिसांनी त्यांच्या विरोधात कंबर कसल्याचे झालेल्या कारवाया वरून दिसत आहे.

दि 7 ऑगस्ट ला ठाणेदार वैभव जाधव यांनी वणी शहरात सर्च ऑपरेशन राबविले. वेगवेगळे पोलिसांचे गट तयार करून त्यांनी शहरातील जुने बस स्थानक परिसर, एकता नगर, पंचशील नगर, खरबडा परिसर, जत्रा मैदान परिसरात असलेले अवैध व्यवसाईकांच्या ठिय्या वर धाड सत्र अवलंबवित त्यांचे ठिय्ये उध्दवस्त केले. ठाणेदार जाधव यांनी अचानक पणे केलेल्या या सर्च ऑपरेशन मुळे अवैध व्यवसाईकांची चांगलीच तारांबळ उडाली होती.