*उपाध्यक्ष प्रवीण डाहुले तर विधानसभा निरीक्षक उमेश वैरागडे
वणी बातमीदार: अवघ्या काही महिन्यावर येऊन ठेपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून बहुतांश राजकीय पक्ष संघटनात्मक बांधणी करताहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष राजु उंबरकर यांनी वणी तालुकाध्यक्षपदी फाल्गुन गोहोकार तर वणी विधानसभा निरीक्षक पदावर उमेश वैरागडे यांची निवड केली आहे.
विदर्भात वणी विधानसभा क्षेत्र मनसेचा गढ मानला जातो. पक्षात खंदे युवा कार्यकर्ते आहेत तर तरुणाईचा जोश मनसेची ताकत असल्याचे दिसून येत आहे. आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, नगर परिषद निवडणुकांच्या अनुषंगाने सर्व राजकीय पक्षाने आपली संघटना मोर्चेबांधणी सुरू केली असताना यातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षातील नेत्यांनी राज्यपातळी ते शाखा पातळीपर्यंत पक्ष बांधणीला सुरुवात केली आहे.
पक्षाने दिलेली जबाबदारी व दाखविलेला विश्वास सार्थ ठरवून, येणाऱ्या काळात होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये पक्षाला यश संपादनाच्या दिशेने नेत तळागाळातील सर्व लोकांच्या समस्या सोडविण्यास कटिबद्ध राहील.
फाल्गुन गोहोकार , वणी तालुकाध्यक्ष मनसे
मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांच्या नेतृत्वाखाली वणी विधानसभा निरीक्षक पदी उमेश वैरागडे तर वणी तालुक्याची जबाबदारी युवा मनसैनिक फाल्गुन गोहोकार यांच्याकडे देण्यात आली असून तालुका उपाध्यक्षपदी प्रवीण डाहुले यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीने सर्व महाराष्ट्र सैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण बघायला मिळत आहे.