विकास कामांना बसत आहे खीळ
वणी :- मुख्याधिकारी संदीप बोरकर यांची आठ महिन्या पूर्वी कामठी येथे बदली झाली. तेव्हा पासून नगर पालिका प्रशासनाचा कारभार प्रभारावर सुरू असून आठवड्यातील दोन दिवस मुख्याधिकारी उपस्थित राहत असल्याने विकास कामांना खीळ बसत आहे.
संदीप बोरकर यांची कामठी येथे प्रशासकीय बदली करण्यात आली होती.त्यांच्या नंतर नवीन मुख्याधिकारी कोण याची उत्सुकता लागली होती.मात्र कोणताही पूर्ण वेळ अधिकारी गेल्या आठ महिन्यापासून देण्यात आला नाही.झरी नगर पंचायतीचे मुख्याधिकारी संदीप माकोडे यांचे कडे प्रभार देण्यात आला आहे.
प्रभारी मुख्याधिकारी संदीप माकोडे हे आठवड्यातून दोनच दिवस पालिकेत उपस्थित राहत असल्याने कामे खोळंबली आहे. अनेक कामाच्या प्रशासकीय मान्यतेचे काम रखडले आहे. त्याच बरोबर भव्य उभारण्यात येत असलेल्या सांस्कृतिक भवनाच्या आतील सजावटीच्या कामाची शासकीय मान्यता प्रलंबित आहे.नगर पालिका कर्मचाऱ्यांचे देखील अनेक कामे प्रलंबित आहे.
नागरिकां अनेक कामा करिता नगर पालिकेत जावे लागते.मात्र पूर्णवेळ मुख्याधिकारी नसल्याने भोगवटा सारख्या प्रमाणपत्रा करिता हेलपाटे मारावे लागत आहे. गेल्या पाच वर्षात नगर पालिकेच्या माध्यमातून शहरात भक्कम विकासाची कामे झाली आहे.मात्र गेल्या आठ महिन्यापासून ‘प्रभारावर’ नगर पालिकेचा गाडा हकल्याजात असल्याने विकास कामांना खीळ बसत आहे.त्यामुळे पूर्णवेळ मुख्याधिकारी देण्याची मागणी जोर धरत आहे.