Home वणी परिसर अंधत्व आलेल्या युवकाला मिळाली ‘दृष्टी’

अंधत्व आलेल्या युवकाला मिळाली ‘दृष्टी’

391

* मंगेश पाचभाई यांचा पुढाकार

वणी :- आदिवासी बहुल भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या झरीजामणी तालुक्यातील मांगली या गावातील 26 वर्षीय युवकाला एक वर्षांपूर्वी दोन्ही डोळ्यांना अचानक अंधत्व आले होते. याची माहिती अडेगाव येथील सामाजिक कामात अग्रेसर असलेल्या मंगेश पाचभाई यांना मिळताच त्या युवकांच्या डोळ्यांची शस्त्रक्रिया करून त्याला दृष्टी दिली आहे.

अडेगाव येथील मंगेश पाचभाई हा युवक परिसरात रक्तदूत म्हणून परिचित आहे. कोणालाही रक्ताची गरज भासल्यास तो कोणत्याही गावात रक्त उपलब्ध करून देण्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून अविरत करीत आहे. कोरोना काळात अनेक बाधित रुग्णांना त्याने उपचाराकरिता रुग्णालयात दाखल केले होते.

मांगली गावातील कैलास टेकाम या 26 वर्षीय युवकाच्या दोन्ही डोळ्याची दृष्टी गेल्याची माहिती मंगेश ला मिळाली. त्याने या युवकाला सावंगी मेघे येथील रुग्णालयात नेऊन डोळ्यांची तपासणी केली व त्याच्यावर शस्त्रक्रिया केली त्यानंतर त्याला दिसणे सुरू झाल्याने त्या युवकाने मंगेश चे आभार व्यक्त केले असून मंगेश ने केलेल्या या कामा मुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Previous articleकिन्हाळा शाळेतील शिक्षिकेंचा गौरव
Next articleवणीत गुरुवारी शेतकरी सभासद मेळावा
Rokhthok News
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.